परभणी/मानवत (Parbhani) :- भरधाव वेगातील ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने ट्रॉलीखाली दबल्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू (Death) झाला. ही घटना मानवत तालुक्यातील मगर सावंगी येथे बुधवार ५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान घडली. युवकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणीच्या मानवत तालुक्यातील मगर सावंगी येथील घटना
कैलास मगर यांनी तक्रार दिली आहे. वैभव मगर असे मृतक युवकाचे नाव आहे. सदर अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी वैभव हा अमोल नवनाथ ढेपे यांच्या ट्रॅक्टर मध्ये कॅनॉलचे काम करुन उरलेले मटेरियल भरण्यासाठी ट्रॅक्टरवर (tractor) बसुन जात होता. गावातील मुंजाभाऊ मगर यांच्या शेताजवळील वळणावर ट्रॅक्टर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. ट्रॅक्टरची ट्रॉली कालव्यात पलटी झाली. ट्रॉली मध्ये बसलेला वैभव ट्रॉलीच्या खाली दबला. अपघाताची माहिती फोनव्दारे नातेवाईकांना देण्यात आली. घटनास्थळी नातेवाईक आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती मानवत पोलिसांना दिली.
ट्रॉली बाजुला करुन वैभवला कोल्हा येथील शासकीय रुग्णालयात(Government hospitals) नेण्यात आले.
त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासुन मृतक घोषीत केले. वैभवच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रॅक्टर चालक अमोल नवनाथ ढेपे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. नागनाथ पाटील करत आहेत. घटनास्थळाला सपोनि. संदिप बोरकर, पोलिस अंमलदार नैताम, सावंत, नरगरे यांनी भेट देऊन पाहणी केली.