परभणी (Parbhani) :- लोकसेवाच्या नावाखाली विना परवाना सुरु असलेल्या लॉजींग(logging) मध्ये भलतेच धंदे सुरु होते. या ठिकाणी पोलिसांनी काही जोडप्यांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी सदर प्रकरणाविषयी अधिक माहिती देण्याचे टाळले. विनापरवाना सुरु असलेल्या या लॉजींगवर १७ जानेवारी रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे.
परभणी शहरातील विनापरवाना लॉजिंगवर पोलिसांची कारवाई
परभणी शहरातील शासकीय रुग्णालयासमोर सुरु असलेल्या लॉजींगवर नानलपेठ पोलिसांनी १७ जानेवारीला दुपारी कारवाई केली. या कारवाई विषयी पोलिसांनी अधिक माहिती देण्याचे टाळले. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी भलतेच धंदे सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. सदर प्रकरणी पोलिस अंमलदार भगवान सोडगीर यांनी तक्रार दिली. लॉजींग चालविण्यासाठी संबंधीत विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र संबंधीत विभागाचे आदेश व निर्देश यांचे उल्लंघन करत अनाधिकृतपणे लोकांना आश्रय देऊन लॉजींग चालवित असताना मिळून आल्या प्रकरणी अमोल पाथरीकर यांच्यावर नानलपेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.नपा. चव्हाण करत आहेत. दरम्यान या अगोदरही सदर लॉजींग मध्ये घडलेल्या विविध घटनांविषयी पोलिसांमध्ये नोंद झालेली आहे.