वीस हजार रुपयांची लाच घेताना देवळा येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अटक File Photo
Published on
:
18 Jan 2025, 5:27 pm
Updated on
:
18 Jan 2025, 5:27 pm
देवळा : गुन्ह्यात अटक न करता नोटीस देण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेताना देवळा येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास जगताप (५४) यांना लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी की ,यातील तक्रारदार यांच्यावर देवळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यात त्यांना अटक न करता नोटीस अदा करण्याकामी संबंधित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास यशवंत जगताप( वय ५४) यांनी वीस हजार रुपयाची लाचेची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने दहा हजार रुपये रोख स्वरूपात दिले व ती स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याने त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे -वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ पाटील पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पोलीस हवलदार सुनील पवार, संदीप वनवे, गणेश साळवे,चालक परशुराम जाधव या सापळा पथकाने ही कामगिरी केली .
संबंधितावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली देवळा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.