मृत रहिम अलीम शेख File Photo
Published on
:
18 Jan 2025, 5:19 pm
Updated on
:
18 Jan 2025, 5:19 pm
अहमदपूर : शहराजवळील लातूर- नांदेड रोड वरील कासनाळे पेट्रोल पंपासमोर एका कारने २० वर्षीय युवकाला भरधाव वेगाने पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे युवकाचा जागीच मृत्यू झाला. रहिम अलीम शेख (वय २०) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज (दि.१८) सायंकाळी ५ वाजता घडली.
अहमदपूर शहरातील ईदगाह रोडवरील उमर कॉलनीतील रहिम अलीम शेख हा एका खाजगी मोटार गॅरेज मध्ये गाड्यांच्या पार्ट मोपींगचे काम करीत होता. आज (दि.१८) सायंकाळी ५ वाजता तो आपले काम आटोपून लातूर -नांदेड रोडवरील कासनाळे पेट्रोल पंपासमोरून अहमदपूर शहरात आपल्या घराकडे परत येत असताना नांदेड कडून अहमदपूरकडे येणाऱ्या एका कारने पाठीमागुन त्याला जोराची धडक दिली. यात सदरील युवकाचा जागीच मृत्यु झाला. कार चालक कारसह फरार आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.