परभणी (Parbhani) :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शेतीनिष्ठ शेतकरी (Farmer)कृषीभूषण कांतराव देशमुख यांना ‘जीवन-साधना गौरव’ पुरस्काराने सन्मानित करून समस्त शेतकर्यांचा आणि शेतात कष्ट करणार्यांचा सन्मान केला आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे सहकार विभागाचे कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) तथा गोंदियाचे पालकमंत्री(Guardian Minister) ना. बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
नांदेड विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार कृषीभूषण कांतराव देशमुख यांना प्रदान
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या (Marathwada University) वर्धापन दिनानिमित्त ३० जानेवारी रोजी सन २०२३-२४ वर्षासाठीचे पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी परभणी जिल्ह्यातील झरी येथील कृषीभूषण कांतराव देशमुख यांना ‘जीवन साधना गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप शाल, ग्रंथ, विद्यापीठ स्मृतीचिन्ह, मानपत्र व २५ हजार रुपये रकमेचा धनादेश असा आहे.
२० हजार लोक वस्तीच्या झरी गावामध्ये पूर्वी २० स्मशानभूमी होत्या
यावेळी मंचावर कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, मनपा आयुक्त गणेश देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. डी. एम. मोरे, इंजि. नारायण चौधरी, हनमंत कंधारकर, डॉ. सुरेखा भोसले, अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, डॉ. पराग खडके, डॉ. डॉ. चंद्रकांत बाविस्कर, डी. एम. खंदारे, संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी मोहमद शकील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांची उपस्थिती होती. यावेळी सत्काराला उत्तर देताना कृषीभूषण कांतराव देशमुख म्हणाले की, २० हजार लोक वस्तीच्या झरी गावामध्ये पूर्वी २० स्मशानभूमी होत्या.
गावची पाण्याची पातळी ५०० फुटावर
आता एकच आहे. एक-गाव एक-स्मशानभूमी प्रत्येक गावात असावी. त्यामुळे सर्व समाजामध्ये एकोपा राहतो. पूर्वी आमच्या गावची पाण्याची पातळी ५०० फुटावर होती. जलयुक्त शिवार योजनांसाठी सर्वाना सोबत घेऊन प्रभावीपणे अंमलबजावणी केली. आज ती २० फुटावर आली आहे. आम्ही दरवर्षी विधवांची भाऊबीज साजरी करतो. महाराष्ट्रातील दिव्यांगाचा विवाह-मेळावा आयोजित केला जातो. शेतीमध्ये अत्याधुनिकता आणण्यासाठी नेहमीच आपण पुढाकार घेत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.