Published on
:
05 Feb 2025, 2:49 am
Updated on
:
05 Feb 2025, 2:49 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि. ५) प्रयागराजमध्ये महाकुंभात सहभागी होणार असून पवित्र स्नान करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्यासह राज्य सरकारचे अनेक वरिष्ठ मंत्री पंतप्रधान मोदींसोबत उपस्थित राहणार आहेत.
१३ जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभात आतापर्यंत १४ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांनीही संगमात आस्थेची डुबकी घेतली. अनेक देशांच्या प्रतिनिधींनीही महाकुंभात स्नान केले आहे.
पंतप्रधान मोदींच्या महाकुंभ दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
सकाळी १०:०५ - पंतप्रधान मोदी प्रयागराज विमानतळावर पोहोचतील.
सकाळी १०:१० - प्रयागराज विमानतळावरून डीपीएस हेलिपॅडला जातील
सकाळी १०:४५ - पंतप्रधान अरेअल घाटावर पोहोचतील
सकाळी १०:५० - अरेअल घाटावरून ते महाकुंभाला पोहोचण्यासाठी बोटीने जातील
सकाळी ११:०० - पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम महाकुंभ मेळ्यासाठी राखीव आहे.
सकाळी ११:४५ - बोटीने अरेळ घाटावर परततील, नंतर डीपीएस हेलिपॅडवर परत जातील आणि प्रयागराज विमानतळाकडे रवाना होतील.
दुपारी १२:३० - पंतप्रधान प्रयागराजहून भारतीय हवाई दलाच्या विमानाने रवाना होतील