मॅट्रिमोनियल साइटवर IAS अधिकारी असल्याचे भासवून दोन महिला अधिकाऱ्यांना लाखो रुपयांना फसवलं. आरोपीच नाव हरिकेश पांडेय आहे. हरिकेशने दिव्यांग भाऊ मुकेश कुमार पांडेयच्या नावाने खोटं प्रोफाइल बनवलं. यूपीच्या हरदोईमधील हे प्रकरण आहे. हरिकेशने हरदोईचा जॉइंट मजिस्ट्रेट असल्याच सांगून महिला अधिकाऱ्यांशी संपर्क केला. तपासात समजलं की, आरोपीने स्वत:च खोटं नियुक्ती पत्र, पॅन कार्ड आणि बँक पासबुक तयार केलं होतं. 11 फेब्रुवारी 2024 रोजी त्याने पीडितेशी संर्पक साधला. नवीन नियुक्ती आणि पगार झाला नसल्याच कारण देऊन त्याने 1 लाख रुपये रोकड आणि 1.23 लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करुन घेतले. त्यानंतर हरिकेशने हरदोईवरुन कासगंजला ट्रान्सफर झाल्याची खोटी कहाणी बनवली.
IAS अधिकारी असल्याचा बनाव करणारा हरिकेश प्रतापगढ जिल्ह्यातील भगवानपुर मुफरिद गावच रहिवासी आहे. आरोपी आयएएस अधिकारी असल्याच भासवून महिला अधिकाऱ्यांना लग्नाच आश्वासन देऊन फसवणूक करत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने shaadi.com वर बनावट प्रोफाइल बनवलं होतं. हरदोई येथे जॉइंट मॅजिस्ट्रेट म्हणून तैनात असल्याच सांगितलं. उन्नाव येथे कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला लग्नाच आश्वासन दिलं.
त्यावेळी महिलेला संशय आला
सॅलरी मिळाली नसल्याच कारण देत त्याने 1 लाख रुपये रोकड आणि 1,23,253 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करुन घेतले. त्यानंतर आरोपीने त्याचं ट्रान्सफर हरदोई येथून कासगंजला झाल्याच महिला अधिकाऱ्याला सांगितलं. महिला अधिकाऱ्याला त्याच्यावर संशय आला. तिने चौकशी केली, त्यात समजलं की, या नावाचा हरदोई येथे कुणी जॉइंट मॅजिस्ट्रेट नाहीय. त्यानंतर तिने सायबर पोलिसात तक्रार नोंदवली. चौकशीत समजलं की, आरोपीने लखनऊमध्ये सुद्धा एका महिला अधिकाऱ्याला अशाच पद्धतीने फसवलय. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून आयएएस नियुक्तीत खोटं पत्र, पॅन कार्ड, पासबुक जप्त करण्यात आलं आहे.
त्याने पैसे कशासाठी घेतले होते?
एसपी नीरज कुमार जादौन यांच्यानुसार, आरोपीने उन्नाव आणि लखनऊमधील महिला अधिकाऱ्याची फसवणूक केली. पीडितेने तिचे पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी हे प्रकरण समोर आलं. पोलीस आता आरोपीच्या अन्य गुन्ह्यांची चौकशी करत आहेत. आरोपी हरिकेश पांडेयने सांगितलं की, “त्यावेळी माझ्या छोट्या भावाची तब्येत चांगली नव्हती, म्हणून मी आयएएस असल्याच सांगून महिला अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले. 1.52 लाख रुपय उधारीवर घेतले होते. मी स्वत: जॉइंट मजिस्ट्रेट असल्याच सांगितलं होतं. मी पैसे परत करीन म्हणून सांगितलं होतं”