श्री तुळजाभवानी मंदिरात तोकडे कपडे घालून दर्शनाला येण्यास मंदिर महासंघाकडून विरोध करण्यात आला आहे. यासंदर्भात तुळजाभवानी ट्रस्टने लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी मंदिर महासंघाने केली आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
मुंबई येथील श्री सिद्धिविनायक ट्रस्टच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरमध्ये ही तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये तोकडे कपडे घालून येण्यास महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून विरोध करण्यात आला आहे. या संदर्भात मंदिर महासंघाकडून तुळजाभवानी संस्थांनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. पुजारी मंडळ आणि मंदिर महासंघ तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू कऱण्यावरून आमने-सामने आले आहेत. दरम्यान, ड्रेस कोड लागू करण्याच्या मागणीला पाळीकर पुजारी मंडळाकडून विरोध करण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थांनकडून हा नियम नाही लागू केला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मंदिर महासंघाकडून देण्यात आला आहे. भारतातील शक्तिदेवताच्या पीठापैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत. त्यातील एक पीठ हे श्री क्षेत्र तुळतापूर हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्त्वाचे तीर्थ क्षेत्र आहे. त्याठिकाणी तुळजाभवानीचे प्राचीन मंदीर आहे. त्यामुळे आता सिद्धिविनायक ट्रस्टच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरमध्ये तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये ड्रेस कोड कायम राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published on: Feb 05, 2025 11:16 AM