महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला त्यानंतर मुंबई हायकोर्टानं नोटीस दिली आहे. संध्याकाळी सहा नंतरच्या मतदानावर आयोगाला नोटीस देण्यात आली. सहा नंतर झालेल्या मतदानाचा स्लिपचा रिपोर्ट निवडणूक आयोगाकडे मागितला तो अद्याप मिळाला नाही.
मुंबई हायकोर्टाकडून महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला आज नोटीस बजावली आहे. यासोबत केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा हायकोर्टाने नोटीस दिली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये संध्याकाळी सहा वाजल्यानंतर ७६ लाख मतदान कसं? यावर याचिकेमध्ये आक्षेप घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने सहा नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत. सुनावणीच्या दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या सुनावणीच्या दरम्यान आंबेडकरांनी युक्तिवाद केलेला आहे. यावेळी निवडणूक आयोगाने संध्याकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत. संध्याकाळी सहा नंतर निवडणूक विभागाने व्हिडिओग्राफी केली का? असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला आहे. निवडणूक आयोगाने आदर्श नियमावली पाळली नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. दोन आठवड्यामध्ये नोटीसीला उत्तर देण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. ‘रिझल्ट्स इलेक्शनचे डिक्लेअर करताना पोल व्होट्स आणि काउंटर्ड व्होट्स यांची जुळवणी झाली पाहिजे. यांची जुळवणी झाली नसेल तर मग रिटर्निंग ऑफिसरकडून तो सगळा डेटा इलेक्शन कमिशनकडे पाठवला गेला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन जे डायरेक्शन देईल त्या डायरेक्शनप्रमाणे त्यांनी तो निकाल दिला पाहिजे’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Published on: Feb 03, 2025 05:58 PM