Premanand Maharaj Net Worth : अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज हे नेहमी चर्चेत असतात. ते सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध गुरू आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचे लाखो भक्त आहेत. त्यांचा उपेदश, मार्गदर्शन ऐकणं लोकांना खूप आवडतं. सोशल मीडियाच्या काळात त्यांची लोकप्रियता खूप वाढली आहे. त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती लोकांना जाणून घ्यायची असते. ते त्यांच्या विविध प्रश्न विचारून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. प्रेमानंद महाराज यांच्याबद्दल विशेषत: त्यांच्या मालमत्तेबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. पण प्रत्यक्षात त्यांची काही मालमत्ता आहे का? यावर खुद्द प्रेमानंदजी महाराजांनी खुलेपणाने उत्तर दिले आहे.
एका व्यक्तीने प्रेमानंद महाराज यांना विचारलं की त्यांच्याकडे काही खासगी मालमत्ता आहे का ? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की त्यांच्याकडे कोणतीही खासगी संपत्ती नाही. त्यांच्या नावे ना बँक अकाऊंट आहे किंवा कोणतीही अचल संपत्ती ( जमीन, घर, फ्लॅट) असं काहीच नाहीये. ते पूर्णपणे तपस्वी जीवन जगतात आणि त्यांच्याकडे कोणतीही भौतिक संपत्ती नसते. त्यांनी स्पष्टपणे हेही सांगितलं की, कोणी त्यांच्याकडे 10 रुपये मागितले तरी ते देण्यास त्यांच्याकडे नाही. त्यांचे जीवन त्याग आणि आध्यात्मिक साधनेवर केंद्रित आहे आणि सांसारिक संपत्तीवर नाही, हे त्यांच्या विधानावरून स्पष्ट होतं.
कुठे राहतात प्रेमानंद महाराज ?
प्रेमानंद महाराज कोणत्याही खाजगी घरात राहत नाहीत. ते एका भक्ताच्या फ्लॅटमध्ये राहतात, जिथे त्याच्या राहणीमानाच्या आणि अन्नाच्या सर्व गरजांची काळजी त्याचे अनुयायी घेतात. वीजबिलही तेच लोक भरतात. प्रेमानंद महाराज यांनी कोणत्याही प्रकारची भौतिक संपत्ती आपल्या नावावर ठेवली नसल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.
प्रेमानंद महाराज यांच्याकडे कोणती कार आहे ?
प्रेमानंद जी महाराज हे अनेकवेळा ऑडी कारमध्ये दिसले आहे, मात्र ही त्यांची वैयक्तिक कार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ही कार त्यांच्या कारसेवकांची आहे, जे त्याचा प्रवासासाठी वापर करतात. प्रेमानंद जी महाराज तपस्व्यासारखं जीवन जगतात आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची मालमत्ता नाही.