पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना शुक्रवारी पहाटे घडली. आळेफाटा येथे खासगी वाहतूक करणारी लक्झरी बस कंटेनरला मागून धडकल्याने अपघात घडला. या अपघातात बसमधील 40 ते 50 प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळतात स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त बस नाशिकहून पुण्याच्या दिशेने चालली होती. यादरम्यान बसने कंटेनरला मागून धडक दिल्याने अपघात घडला. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने कंटेनरला धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळते. पोलीस पुढील तपास करत आहेत.