अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रारीFile photo
Published on
:
07 Feb 2025, 6:02 am
Updated on
:
07 Feb 2025, 6:02 am
पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याविरुध्द आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारींची शहानिशा करून पुढील योग्य ती कारवाई करू, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
येरवडा परिसरात एका कार्यक्रमानिमित्त ते आले असता त्यांनी ही माहिती दिली. नुकताच राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात सर्वत्र याचे पडसाद उमटले होते.
समाजमाध्यमांवरदेखील सोलापूरकर यांना मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबरोबर त्यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. सोलापूरकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा सामाजिक तसेच राजकीय संघटनांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
याचदरम्यान काही संघटनांनी स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये तसेच पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन सोलापूरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांकडे तक्रारी आल्या असून, त्या तक्रारीची शहानिशा करून पुढील योग्य ती कारवाई करण्याची माहिती त्यांनी दिली.