Risod Assembly Elections: विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज

2 days ago 2

रिसोड (Risod Assembly Elections) : 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने (Risod Assembly Elections) रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.19 नोव्हेंबर रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समीती मध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्य वाटपाची नियोजन करण्यात आले होती. येथून महामंडळाच्या बसने निवडणूक अधिकारी व कर्मचारी आपापल्या बूथकडे रवाना झाले आहेत. रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण 323623 मतदार असून त्यापैकी 168377 पुरुष तर 155246 महिला मतदार आहेत.

अपंग मतदारांची संख्या 2834 असून 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 3608 आहे. अपंग आणि वृद्ध मतदारांनी यापूर्वीच मतदान केले आहे. या (Risod Assembly Elections) मतदारांच्या मतदानासाठी 350 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये रिसोड तालुक्यात 182 तर मालेगाव तालुक्यात 168 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.मतदान प्रक्रियेसाठी एकूण 1450 मतदान कर्मचारी असून त्यामध्ये 35 प्रादेशिक अधिकारी आणि 35 पोलिस प्रादेशिक अधिकारी आहेत. निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना बुथवर पोहोचणे व मतदान प्रक्रिया संपल्यानंतर परत आणण्याकरिता 38 महामंडळाच्या बसेस आणि 59 खाजगी वाहनांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक्षा तहसीलदार रिसोड, दीपक पुडें तहसीलदार मालेगाव, सतीश शेवदा मुख्याधिकारी नगर परिषद रिसोड या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

रिसोड विधानसभा मतदार संघातील उमेदवारांची तिसरी खर्च तपासणी संपन्न

रिसोड ३३- रिसोड विधानसभा मतदार संघातील उमेदवारांची खर्चाची तिसरी तपासणी खर्च निरीक्षक के. मनोरंजन नायक (आयआरएस) यांच्या उपस्थितीत दि. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी तहसील कार्यालय, रिसोड येथे यशस्वीरित्या पार पडली. या तपासणीत १३ उमेदवारांपैकी ९ उमेदवार/प्रतिनिधी उपस्थित राहून खर्च सादर केला. या बैठकीत खर्च निरीक्षक के.मनोरंजन नायक (आयआरएस) यांनी सर्व उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवह्याची तपासणी केली. दुस-या तपासणीत १६ नोव्हेंबर अखेर उमेदवारांनी खर्च नोंदविला आहे.

तिस-या तपासणीनंतर उमेदवारांच्या खर्चाचे दैनंदिन नोंदवही (Risod Assembly Elections) मा. निवडणूक आयोग यांच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली आहे. तिसऱ्या तपासणीसाठी दिनकर जाधव नोडल अधिकारी, विजय जवंजाळ सहायक नोडल अधिकारी, दिनानाथ चांगले, सहाय्यक खर्च निरीक्षक ,खर्च पथक प्रमुख सु.मु. बाचेवाड व सहायक आशिष पेटकर व सर्व पथक सदस्य उपस्थित होते.असे वैशाली देवकर निवडणूक निर्णय अधिकारी, ३३- रिसोड विधानसभा मतदारसंघ, रिसोड यांनी कळविले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article