गेल्या आठवड्यात बुधवारी, 15 जानेवारीला मध्यरात्री अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला होता. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या व्यक्तीला फने रोखायचा प्रयत्न केला, त्यांची झटापट झाली. त्यानंतर आरोपीने सैफवर चाकूने सपासप वार केले, त्याला 6 जखमा झाल्या. घरातील केअरटेकरच्या मदतीने सैफ खाली उतरला आणि समोर आलेल्या रिक्षात बसून त्याने तातडीने लीलावती हॉस्पिटल गाठलं. तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, चाकूचा तुकडाही बाहेर काढण्यात आला. प्रकृतीचा धोका टळल्ायनंतर अखेर दोन दिवसांपूर्वी ( मंगळवारी) सैफ हा घरी परतला. मात्र त्यापूर्वी सैफने त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यास मदत करणार ऑटो चालक भजन सिंह राणा यांची भेट घेतली, त्यांची विचारपूस करत मदतीसाठी आभारही मानले
यावेळी सैपचे कुटुंबीय, त्याची आई शर्मिला टागोर यांनीही भजन सिंह यांच्यासमोर हात जोडत त्यांचे आभार मानले. काही रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खान याने त्या ऑटो रिक्षा चालकाला 50 हजार रुपयेही दिले. मात्र त्याबाबत सैप अथवा भजन सिंह यांच्यापैकी कोणीच अधिकृत भाष्य केलेले नाही.
तर गायक मिका सिंह यानेही त्या ऑटो चालकाला 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. पण ऑटो चालक भजन सिंह राणा यांना मात्र पैशांचे किंवा इतर गोष्टींचा मोह नाही. त्याची खरी इच्छा काही वेगळीच आहे.
काय आहे भजन सिंह राणा यांची इच्छा ?
मी सैची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याची प्रकृती आता सुधारली आहे, सैफने माझे आभार मानले. तिथे हॉस्पिटलमध्ये सैफची आई शर्मिला टागोर या होत्या, सारा अली खानही होती, सगळ्यांनी माझे आभार मानले, असे भजन सिंह राणा यांनी सांगितलं. एवढ्या मोठ्या कलाकारांना भेटून मलाही बरं वाटलं. कधी काही हवं असेल तर मला नक्की सांगा, असं म्हणत सैफने मदतीचं आश्वासन दिल्याचं ते म्हणाले.
बोलता बोलता भजन सिंह यांनी मनातील एक इच्छा व्यक्त केली. संधी मिळाली, काम मिळालं तर फिल्ममध्ये एखादा छोटा-मोठा रोल मी नक्की करेन, काम करण्यासाठीच इथे आलोय. त्यामुळे जर चित्रपटांत एखादं काम मिळालं तर नक्की करायला आवडेल असं राणा यांनी नमूद केलं
दुसरी इच्छा काय ?
उपचारांनंतर सैफ अली खान हॉस्पिटलमधून बाहेर पडण्यापूर्वी भजन सिंह राणा यांची त्याच्याशी पुन्हा भेट झाली. तेव्हा सैफने त्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस दिल्याचे वृत्त आहे, तसेच पुढे कोणतीही मदत लागली तर मागा असे आश्वासनही सैफने दिल्याचे समजते. त्याबद्दल ऑटो चालक भजन राणा म्हणाले, मला त्याच्याकडून काही नको, मी तसं काही मागत तर नाहीये. पण त्यांना जर (मला) ऑटो रिक्षा देण्याची इच्छा असेल तर मी ती घेईन. पण मी स्वत:हून, आपणहून त्यांच्याकडे काहीच मागितलं नाही, मी त्या दिवशी जे काम केलं त्याच्या बदल्यात मला काही मिळावं असा मोह किंवा लालच माझ्या मनात नाहीये, असं त्यांनी स्पष्ट केलं.
खरंतर, ऑटोचालक भजन सिंग मुंबईत भाड्याच्या घरात राहतात. याशिवाय ते चालवत असलेली रिक्षाही त्यांची स्वत:ची नाही. याचे भाडेही भजनसिंग यांना भरावं लागतं. अशा परिस्थितीत एका सामाजिक कार्यकर्त्याने सैफ अली खानला असं अपील केलं आहे की त्यांनी, भजन सिंह यांना एक ऑटो रिक्षा भेट द्यावी, असे आवाहन केले आहे. भजनसिंगलाही भेट म्हणून ऑटोरिक्षा हवी आहे.
आत्तापर्यंत किती मिळालं बक्षीस ?
सैफ अली खानला मदत केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ता फैजान अन्सारी याने ऑटोचालकाला 11 हजार रुपयांचे बक्षीस दिले होते. यानंतर सैफने स्वतः 50 हजार रुपये दिले आहेत. गायक मिका सिंगने 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याचे नुकतेच समोर आले आहे.