शिक्षक व विद्यार्थी वर्गा आनंदाचे वातावरण
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Squash Sports Competition) : अमरावती येथे राज्यस्तर सबज्युनियर, ज्युनियर, सिनीयर मुले, मुली यांची स्क्वॅश क्रिडा स्पर्धा परीक्षा पार पडली. या स्पर्धेमध्ये चिखली आदर्श विद्यालयामध्ये वर्ग ९ वा (फ) मधील विद्यार्थीनी कु नेत्रा वेंडोले हिने (Squash Sports Competition) खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून राज्यस्तरीय कांस्यपदक मिळविले.
चिखली येथील आदर्श विद्यालयातील वर्ग ९ वी तुकडी (फ) मध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनी कु नेत्रा अविनाश वेंडोले ही शाळेत अतिशय हुशार व चंचल स्वभावाची आहे .तिला खेळाची आवड असल्याने ती शाळेत पाचवी पासून विविध खेळामध्ये भाग घेवून प्रथम क्रंमांक पटकावत असे हे पाहून वर्ग शिक्षक विकास जाधव यांनी तिला अमरावती मध्ये होवू घातलेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावतीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या स्क्वॅश क्रिडा स्पर्धेत नाव नोंदणी केली .आणि तिनेही खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून राज्यस्तरीय दुतिय क्रमांक पटकावून कांस्यपदक मिळविले.
यासाठी कोच शिक्षक संतोष गुळवे , हेमराज कोळी यांचे मार्गदर्शन लाभले तर शाळेचं संचालक प्रेमराजजी भाला, रामकृष्ण शेटे, मुख्याध्यापक गव्हले सर, पवन लढढा यांनी मार्गदर्शन करून मोलाचे सहकार्य लाभले त्याच बरोबर या कामगिरी बद्दल आई वडील नातेवाईक , सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुष्प गुच्छ देवून सत्कार केला.