परभणीतील जिंतूर रोडवरील धावणार्या एसटीने वेधले लक्ष
परभणी (ST Bus) : दिल्लीत प्रदूषणाने कहर केल्याने नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. देशभरात प्रदूषणाने मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या कालबाह्य रस्त्यावर धावताना धूर ओकत प्रदूषणात भर घालत आहेत. महामंडळाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
परभणी आगारातून महामंडळाला चांगले उत्पन्न मिळते, मात्र (ST Bus) महामंडळाकडून फारशा सुविधा मिळत नाहीत. परभणी आगारातून अनेक बसगाड्या मोडकळीस आलेल्या आहेत.आसन व्यवस्था पार खिळखीळी झालेली आहे. पावसाळ्यात तर अनेक बसगाड्यातून पाण्याची गळती होते. प्रवाशांना छत्री लावून प्रवास करावा लागतो. परभणी – जिंतूर हा गोल्डन रुट म्हणून ओळखला जातो. मात्र बुधवार २० नोव्हेंबर रोजी शहरातील जिंतूर रोडवरुन धूर ओकत धावणारी एसटी बस पादचार्यांसह नागरीकांचे लक्ष वेधून घेत होती. बसमागे असलेल्या वाहन चालकांना अक्षरश: श्वास घ्यायला त्रास होत होता. महामंडळाने याकडे लक्ष देण्याची गरज.
रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण्
आजही प्रवाशांच्या (ST Bus) एसटी महामंडळाच्या बसगाड्यावर विश्वास आहे. प्रवाशी एसटीने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र परभणी आगारातून ग्रामीण भागात सुटणार्या बहूतांश एसटी बसेस मोडकळीस आलेल्या आहेत. रस्त्यात कधी बंद पडेल, असा नेम नाही. परभणी – गंगाखेड, परभणी – जिंतूर आणि परभणी – हिंगोली मार्गावर एसटी बस बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो. मात्र महामंडळाला याचे काहीही सोयरसुतक राहिले नाही.ा वाढले