Published on
:
05 Feb 2025, 4:50 am
Updated on
:
05 Feb 2025, 4:50 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आजपासून सुरु होत असलेल्या तीन दिवसांच्या पतधोरण बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी, भारतीय शेअर बाजारात आज बुधवारी सपाट पातळीवर सुरुवात केली. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स सुमारे १५० अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७८,५०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक २३,७४० वर सपाट पातळीवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, झोमॅटो, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, आयटीसी हॉटेल्स हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत. तर एशियन पेंट्सचा शेअर्स ४ टक्के घसरला. टायटन, नेस्ले इंडिया, एम अँड एम हे शेअर्स १ ते ३ टक्के घसरले आहेत.
क्षेत्रीय निर्देशांकाची काय स्थिती?
निफ्टी पीएसयू बँक, मीडिया, ऑईल अँड गॅस हे क्षेत्रीय निर्देशांक सुमारे १ टक्के वाढले आहेत. निफ्टी आयटी, मेटल, रियल्टी आणि हेल्थकेअरही तेजीत आहेत. तर बीएसई मिडकॅप ०.८ टक्के आणि स्मॉलकॅप १.१ टक्के वाढला आहे.