Vicky Kaushal: अभिनेता विकी कौशल सध्या ‘छावा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात विकी छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या अभिनेता ‘छावा’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विकी कौशल याने मराठीत संवाद साधला. एवढंच नाहीतर, मी पंजाबी कुटुंबातील आहे. पण महाराज आमच्यासाठी देखील ते दैवतच आहेत… असं वक्तव्य अभिनेत्याने केलं आहे. शिवाय लहानपणीच्या आठवणी देखील ताज्या केल्या.
‘लोकमत फिल्मीला’ दिलेल्या मुलाखतीत विकी कौशल म्हणाला, माझा जन्म मलाडमधील मालवणी कॉलनीमधील एका चाळीत माझा जन्म झाला… तेथून अंधेरीला आलो… वन बेडरुम… 10 वी पर्यंत माझ्या शाळेत मराठी हा विषय होता. एसएससीमध्ये माझं शिक्षण झालं आहे. मला दहावीमध्ये मराठीच चांगले मार्क आले इंग्लिशमध्ये कमी होते… माझे खूप मित्र होते त्यांच्यासोबत मी क्रिकेट खेळलो… सगळे मित्र माझे मराठीच होते.
हे सुद्धा वाचा
मला मराठी बोलता येत… फार उत्तम मराठी मी बोलू शकत नाही. पण मला मराठी भाषा समजते. मला असं वाटतं जो पण मुंबईमध्ये, महाराष्ट्रात जन्मलाय, काम करतोय त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळं माहितंच असतं. महाराज काय आहेत हे बोलण्याची गरज नाही. मी पंजाबी कुटुंबातील आहे. पण आमच्यासाठी देखील ते दैवतच आहेत. कोणी सांगितलं म्हणून नाही तर, लहानपणापासून पाहत आलोय…
ज्या बिल्डिंगमध्ये मी मोठा झालोय त्या बिल्डिंगच्या गेटवर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असायची. आम्ही रोज हार बदलायचो… त्यांच्यासमोर क्रिकेट खेळलोय… त्यामुळे लहानपणापासून ते माझ्यात आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे..’ सध्या सर्वत्र विकी कौशल याची चर्चा रंगली आहे.
सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री रश्मिका मंदाना ही छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत आहे. तर औरंगजेबाच्या भूमिकेतील अक्षय खन्ना यांनी सर्वांनाच चकीत केलं आहे. सिनेमा 14 फेब्रुवारी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.