कल्याण-भिवंडीPudhari News network
Published on
:
27 Nov 2024, 11:19 am
Updated on
:
27 Nov 2024, 11:19 am
डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसर व्हर्टेक्स इमारतीतील भीषण आगीमुळे एकीकडे शहरात खळबळ उडाली असतानाच कल्याणच्या सापर्डे गावाचा परिसर गूढ धक्क्यांनी हादरल्याचे समोर आले आहे.
मंगळवारी (दि.26) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास गूढ धक्क्यांचा प्रकार घडल्याची माहिती स्थानिक रहिवाशी यांनी दिली. तर दुसरीकडे कोन गाव, सरवली, तसेच भिवंडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये धक्के जाणवले विशेष म्हणजे दोन दिवांपूर्वीच मुरबाड तालुक्यातील काही गावांमध्येही धक्के जाणवले आहेत.
मंगळवारी (दि.26) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास अचानक काही सेकंद किंवा मिलीसेकंदासाठी अचानक जमीन हादरल्याची माहिती हे हादरे जाणवलेल्या गावातील स्थानिक नागरिकांनी दिली. मात्र काही कळायच्या आतमध्ये हे हादरे जसे जाणवले तसेच थांबले अशी माहिती या स्थानिक रहिवाशांनी दिली. अचानक जाणवलेले हे हादरे नेमके कशामुळे जाणवले असावेत ह्याचे गूढ वाढले असून गावातील रहिवाशांमध्ये काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या संदर्भात आसपासच्या परिसरामध्ये चौकशी केली असता त्याठिकाणी मात्र काही हादरे जाणवले नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या गूढ हादऱ्यांबाबत शासकीय स्तरावरून अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.