तुमसर तालुक्यातील डोंगरी(बु) जवळिल रेल्वे मार्गावरील जंगल शिवारातील घटना
तुमसर (Tiger Accident) : तालुक्यातील डोंगरी (बु) जवळील जंगल शिवारातून तुमसर वरुन तुमसर-तिरोडी रेल्वे लोह मार्गांवरून जात असलेल्या (Tiger Accident) रेल्वे गाडीच्या धडकेत अंदाजे दोन ते तिन वर्षाचा एक पट्टेदार वाघ गंभिर जखमी झाल्याची घटना दि. १५ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच ते सहा वाजता दरम्यान घडली.
सदर रेल्वे गाडीच्या धडकेत पट्टेदार वाघाची शेपुट व एक पाय कापल्या गेल्याने (Tiger Accident) वाघ गंभीर जखमी झाला आहे. पाय व शेपुट निकामी झाले असल्याने जखमी अवस्थेत वाघ रेल्वे रूळाच्या बाजुलाच सकाळी ११ वाजतापर्यंत बसुनच होता. अशी माहिती वनविभागाच्या अधिकार्यांनी दिली. अपघात होताच दरम्यान रेल्वे गाडी सुध्दा थांबली होती. दरम्यान नागरिकांनी सुध्दा घटनास्थळी वाघ बघण्यासाठी गर्दी केली होती.
सदर घटनेची माहिती होताच घटनास्थळी तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी सि.जी.रहांगडाले व नाकाडोंगरी प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे व नागपुर वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय चमुसह घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केले. जखमी वाघाला जेरबंद करून प्राथमिक उपचार करून नागपुर येथे पुढील उपचारांसाठी गोरेवाडा प्राणीसंग्रहालय दाखल करण्यात आले आहे.
तुमसर-तिरोडी रेल्वे मार्ग हा तालुक्यातील जंगल व्याप्त भागातुन गेला आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने वन्यप्राणी पहाटेच्या सुमारास वाघिणी आपल्या दोन शावकासह पहाटे जंगलात भ्रमती करीत होते. दरम्यान रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेच्या आवाजाने घाबरत रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजुला उंच टेकडी आहे. सदर टेकडीवरील चट्टान दगडांवर चढुन तिनही वाघ जंगलात पळ काढण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यान एका वाघाचे (शावकाचे) दगडावरुन पाय खाली घसरल्याने (Tiger Accident) वाघाला रेल्वेची धडक बसली. त्यात त्यांची शेपुट व पाय कापल्या गेला. दरम्यान एक शावक व वाघीणीने जंगलात पळ काढला, अशी माहिती प्रत्यक्ष दर्शी नागरिकांनी दिली आहे.