न्यूझीलंडच्या दिग्गड खेळाडूची कसोटीतून निवृत्ती Pudhari Photo
Published on
:
15 Nov 2024, 5:58 am
Updated on
:
15 Nov 2024, 5:58 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज टिम साउथीने इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेनंतर खेळाच्या प्रदीर्घ फॉर्मेटमधून निवृत्त होणाच्या घोषणा केली आहे. त्याचा शेवटचा सामना न्युझीलंडमधील स्वानसाँग ख्रिसमसच्या आधी हॅमिल्टन येथील सेडॉन पार्क येथे त्याच्या घरच्या मैदानावर होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती वृत्तसंस्था 'एएनआय'ने दिली आहे.