वॉशिंग्टन, फिलाल्डेफियानंतर आता ह्युस्टनमध्ये विमान दुर्घटना घडली आहे. ह्युस्टनहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या युनायटेड एअरलाईन्सच्या विमानाला रविवारी आग लागली. उड्डाण घेण्याच्या काही क्षण आधीच विमानाच्या इंजिनमध्ये आग लागली. सुदैवाने यात जीवितहानी टळली. प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली.
ह्युस्टनमधील जॉर्ज बुश इंटरकॉन्टिनेंटल विमानतळावरून रविवारी सकाळी 8.30 वाजता नियोजित वेळेनुसार न्यूयॉर्कसाठी विमान उड्डाण करणार होते. मात्र उड्डाणाला काही क्षण शिल्लक असतानाच पायलटला इंजिनमध्ये समस्या असल्याचे लक्षात आले. यानंतर विमान रनवेवरच टेकऑफ करण्यात आले. विमानात 104 प्रवाशी होते. सर्वांना सुखरुप विमानातून बाहेर काढत बसने टर्मिनलमध्ये आणण्यात आले. यामुळे जीवितहानी टळली.