ग्रॅमी सोहळ्यात वादग्रस्त ठरली कान्ये वेस्टची पत्नी, कॅमेरासमोर दिली न्यूड पोज x account
Published on
:
03 Feb 2025, 6:59 am
Updated on
:
03 Feb 2025, 6:59 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - संगीत जगतातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित पुरस्कार समारंभ ग्रॅमी ॲवॉर्ड्स अमेरिकेतील लॉस एंजिल्समध्ये सुरु आहे. दरम्यान, ग्रॅमीमध्ये रॅपर कान्ये वेस्ट आणि त्याची पत्नी-मॉडल बियांका सेंसरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने कॅमेरासमोर न्यूड पोज दिल्याने तिला ग्रॅमी ॲवॉर्ड सोहळ्यातून बाहेरचा दाखवण्यात आला. बियांका या सोहळ्यात पारदर्शक कपड्यांमध्ये पोहोचली. रिपोर्ट्सनुसार, दोघांना या कार्यक्रमातून बाहेर करण्यात आले.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
पारदर्शक आऊटफिट घातल्याने बियांकाची चर्चा अधिक होत आहे. असे म्हटले जात आहे की, कान्ये वेस्ट आणि त्याची पत्नी ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात ५ लोकांसोबत पोहोचले होते. यावेळी तिने कॅमेरासमोर पारदर्शक कपड्यांमध्ये न्यूड पोज दिल्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल होत आहे.
कान्ये वेस्ट हा टाई डॉला साइन सोबत 'कार्निवल' साठी सहकार्य केल्याने सर्वोत्कृष्ट रॅप गाण्यासाठी नामांकित आहे.