परभणी (Parbhani) :- शहरातील सर्वसोयीनीयुक्त बसपोर्टचे उद्घाटन अखेर झाले. नवीन बसस्थानकातून (Bus stand) एसटी बसेस सोडण्यात येत आहेत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. सध्या ऊरुस यात्रेनिमित्त प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. मात्र इतक्या वर्षानंतरही बसपोर्टचे काम अजून पूर्ण झाले नाही. बसस्थानकात अजूनही पोलिस कक्ष उभारण्यात आला नाही. शिवाय सीसीटीव्ही (CCTV)कॅमरे सुध्दा पुर्ण क्षमतेने सुरु केले नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बसपोर्टमध्ये सहाच सीसीटीव्ही कॅमेरे; चोरीच्या घटनात वाढ
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीचे औचित्य साधून गेलेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या बसपोर्टचे उद्घाटन करण्यात आले. इमारतीत विविध विभाग सुरु करण्यात आले आहेत. सुसज्ज इमारतीमध्ये आसन व्यवस्था, प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे. प्रवाशांची देखील प्रचंड गर्दी दिसून येत आहे. मात्र सध्या परभणी शहरात सुरु असलेल्या ऊरुस यात्रेमुळे आणखी भर पडली. गर्दीत प्रवाशाचे सामान, पर्स चोरी जाण्याच्या घटना होत असताना बसपोर्टमध्ये पोलिस कर्मचारी दिसून येत नाही. जुन्या बस स्थानकातील चौकीतच पोलिस कर्मचारी, होमगार्डची व्यवस्था केली आहे.
पोलीस चौकीच्या जागेसाठी येवढा वेळ का लागत आहे ?
सध्या बस डेपोत एक अधिकारी, दोन कर्मचारी, तीन होमगार्ड असा दररोजचा बंदोबस्त असतो. सात सिसिटीव्ही उपलब्ध आहे, मात्र ते सुरु आहेत का नाही याची खात्री नाही. मात्र पोलीस चौकीच्या जागेसाठी येवढा वेळ का लागत आहे ? अजुन तरी स्पष्ट या बाबत बोलण्यास कोणी ही तयार नाही. सध्या परभणीत तुरत पिर बाबा यांच्या उरुसाची सुरुवात झाली असून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात बसने परभणीला येत आहेत. त्यामुळे सध्या स्थानकात प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा चोरटे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न एैरणीवर आल्याचे दिसून येत आहे.