हिरवी वेलची किचनमध्ये सहज पाहायला मिळते. जेवण रूचकर करण्यासाठी वेलचीचा सहज वापर केला जातो. गृहणी रोजची एक सवय म्हणून जेवनात वेलची टाकतात. वेलचीमुळे जेवणाची चव वाढते आणि सुगंधामुळे खाण्याची ओढ वाढते. पण या हिरव्या वेलचीचे आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का? हिरव्या वेलचीचे आयुर्वेदात अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले गेले आहेत. अनेकांनी रोज वेलची खाण्याची सवय असते. माउथ फ्रेशनर म्हणून वेलचीचा वापर करतात. हिरव्या वेलचीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. पण हीच हिरवी वेलची रोज खाल्याने काही त्रास तर होत नाही ना.. याविषयी आरोग्य तज्ज्ञांनी आपलं मत मांडलं आहे.
प्रवेक कल्पचे कन्सल्टंट डॉ. जी एस तोमर यांनी सांगितलं की, हिरवी वेलची तोंड्यात ठेवल्याने खूप फायदे होतात. यामुळे तोंडातून येणारी दुर्गंधी दूर होते. तसेच सुगंधामुळे फ्रेश वाटतं. हिरव्या वेलचीत पाचक तत्व असतात. त्यामुळे पचनसंस्था मजबूत होण्यास मदत होते. यामुळे पचनाच्या समस्याही दूर होतात. यामुळे वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. हिरव्या वेलची तणावविरोधी गुणधर्म आहे. त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. तसेच चांगली झोपही लागते.
हिरव्या वेलचीत अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. ऋतु बदलाचा शरीरावर फारसा परिणाम होत नाही. तसेच शरीराचे आजारांपासून संरक्षण करते. तसेच रक्तदाबही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसेच वेलचीमुळे कोलेस्टोलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. वेलचीत अँटीऑक्सिडेंट्स असल्याने नजर चांगली राहते. मोतिबिंदूसारख्या समस्या उद्भवत नाही. वेलचीचे खूप सारे फायदे असले तरी, गर्भवती महिलांनी हिरवी वेलची जास्त प्रमाणात खाऊ नये. यामुळे त्रास होऊ शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)