परभणी/गौर(Parbhani) :- पूर्णा तालुक्यातील गौर गावातील महादेव मंदिर परिसरातील रोहित्र जळून चार महिने उलटूनही कुठलाही अभियंता व कर्मचारी याकडे लक्ष देत नसल्याने परिसरातील नागरिकांनी अंधकारमय जीवन जगावे लागत आहे. याबाबत महावितरचे सहायक कनिष्ठ अभीयंता वसमतकर यांच्याकडे वारंवार विनंती करूनही संबंधित कामचुकार अधिकारी याकडे पुर्ण पणे दुर्लक्ष करत आहे.
अधिकार्यांच्या नाकर्तेपणामुळे परभणीच्या महादेव मंदिर परिसर अंधारात
यंदा समाधानकारक पाऊस(Rain) झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, वारंवार खंडीत होणार्या विजपूररवठ्यामुळे शेतकर्याबरोबर व गावकरी त्रस्त झाले आहेत. महावितरण कंपनीच्या (Maha organisation company) तुघलकी कारभारामुळे पाणी असूनही ते शेताला देता येत नाही. या प्रकारामुळे शेतकर्यातून कमालीचा संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात विजेची वाट पाहण्यातच शेतकर्यांचा दिवस निघून जातो, अशी स्थिती आहे.
तुघलकी कारभारामुळे पाणी असूनही ते शेताला देता येत नाही
मागील काही दिवसात तालुक्यात वीज वितरण कंपनीचा कारभार मोठ्या प्रमाणात ढेपाळला असून वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकर्यांसह सर्वसामान्य त्रस्त आहेत. याबाबत वरिष्ठ अधीकारी उपकार्यकारी अभीयंता रामगिरवार यांच्याकडे तक्रार करूनही उपाययोजना केली जात नसल्याने शेतकर्यांसह गावकर्यानी आता दाद मागायची तरी कोठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधीकार्यांनी व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे.