आजकालच्या व्यस्त जीवनशैलामुळे स्वत:कडे लक्ष देता येत नाही. ज्यामुळे केस वाढतात आणि तुमचा लूक चांगला दिसत नाही. चांगले दिसण्यासाठी अनेक पुरुष दाढी आणि केस कापण्यासाठी रविवारचा दिवस निवडतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? हिंदू धर्मामध्ये प्रत्येक आठवड्यातील काही दिवस केस आणि दाढी कापण्यासाठी शुभ मानले जातात. आठवड्यात कधी केस कापले पाहिजेल हे तुमच्या जन्मतिथी, राशी, नक्षत्र आणि सामाजिक स्थितीवर आधारीत असते. या सर्व प्रक्रियेमध्ये धार्मिक मान्यतेला देखील विशेष महत्त्व दिले जाते. चला तर जाणून घेऊया आठवड्यातील कोणत्या दिवशी केस आणि दाढी केली पाहिजेल.
केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी विविध समुदायामध्ये विशेष दिवस आणि मुहूर्त सांगितले आहे. तुमच्या केसांचे नाते तुमच्या आयुष्याशी आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घटना तुमच्या कुंडलीती ग्रहांशी संबंधित असतात. धार्मिक मान्यतेनुसार, सोमवारचा दिवस चंद्राशी संबंधित असतो ज्यामुळे या दिवशी दाढी कापणे अशुभ मानले जाते. हिंदू धर्मानुसार, सोमवारी केस कापल्यामुले तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच सोमवारी केस कापल्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक चणचण भासू शकते.
मंगळवाच्या दिवशी केस कापल्यामुळे आणि दाढी केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये चुकिच्या घटणा घडू शकतात. मंगळवारी केस कापल्यामुळे तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी वेळेवर होत नाहीत त्यासोबतच रक्तासंबंधित आजार होण्याची शक्यता आहे. बुधवारच्या दिवशी केस कापल्यामुळे तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. बुधवारच्या दिवशी दाढी केल्यामुळे आणि केस कापल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. हिंदू धर्मामध्ये गुरूवारच्या दिवशी केस कापल्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे त्यासोबतच या दिवशी काही विशेष पूजा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते. गुरूवारी केस कापल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील अडथळे दूर होण्यास मदत होते. शुक्रवारी केस आणि दाढी केल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. शुक्रवारी केस कापल्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये प्रगती होण्यास मदत होते. त्यासोबतच तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो.
शनिवारच्या दिवशी दाढी केल्यामुळे आणि केस कापल्यामुळे तुमची सामाजिक आणि आर्थिक प्रगती होण्यास मदत होते. शनिवारी दाढी केल्यामुळे तुमच्यावर शनिदेवची कृपादृष्टी राहाते आणि तुमच्या कडे पैसाच पैसा येतो. अनेकंना रविवारच्या दिवशी केस कापण्याची सवय असते, त्याचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी अनेकांना सुट्टी असते. परंतु ज्योतिशास्त्रानुसार रविवारच्या दिवशी केस कापणे अशुभ मानले जाते. रविवारच्या दिवशी केस कापल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती खराब होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे निर्माण होतात.