नागपूर (Samaj Bhushan Award) : बहुउद्देशिय तिरळे कुणबी संघातर्फे (Tirle Kunbi Sangha) विदर्भ प्रदेश शेतकरी नेते, लोकनायक आणि दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांना रविवारी आयोजित भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ‘समाजभूषण पुरस्कार’ (Samaj Bhushan Award) प्रदान करण्यात आला. त्रिमूर्तीनगरातील अनुसया मंगल कार्यालयात मोठ्या थाटात पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दीनानाथ पडोळे (Former MLA Dinanath Padole) होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, ( Dental College Dr. Abhay Datarkar )अभ्यासक प्रवीण देशमुख, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री परिणय फुके, सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराव पन्नासे, गिरीश पांडव, सलील देशमुख, प्रवीण कुंटे पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी संघातर्फे मान्यवरांच्या हस्ते प्रकाश पोहरे यांना ‘समाजभूषण (Samaj Bhushan Award) पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छव स्मृतीचिन्ह असे आहे. यावेळी संघाचे संस्थापक सुरेश गुडधे पाटील, अध्यक्ष जानराव पाटील केदार, उपाध्यक्ष रमेशचंद्र ठवळे पाटील, सचिव अशोक पांडव, उद्योजक प्रभाकरराव देशमुख, अवंतिका लेकुरवाळे, वृंदा नागपुरे, उज्ज्वला बोढारे, वृंदा विकास ठाकरे, सुनीता ठाकरे, रेखा बाराहाते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी दीनानाथ पडोळे यांनी अध्यक्षीय भाषणात प्रकाश पोहरे यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले.तसेच त्यांच्या कार्यावर पुस्तक लेखन करण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी अन्य मान्यवरांनीही त्यांचे विचार मांडले. वामनराव येवले यांनी संचालन केले, तर रवि देशमुख यांनी आभार मानले.
- काळाची पाऊले ओळखून मार्गक्रमण करा-प्रकाश पोहरे
सत्काराला उत्तर देताना प्रकाश पोहरे म्हणाले, कुणबी समाज हा अनेक पोटजातीत विभागला आहे. त्यामुळे आपण एकसंघ होऊ शकलो नाही. पण आज आपल्याला संघटित होण्याची गरज आहे. जुन्या वाईट चालिरीती, प्रथा, परंपरा आपल्याला मोडाव्या लागतील. प्रगतीचे नवे मापदंड शोधावे लागतील. काळाची पाऊले ओळखून मार्गक्रमण करणे आज आवश्यक झाले आहे, असेही ते म्हणाले. आपला मूळ व्यवसाय शेती होता आणि आहे. परंतु शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने समाजाची आर्थिक स्थिती खराब होत आहे. त्यातून आत्महत्येचे प्रकारही वाढत आहे. अशा स्थितीत शेतीबरोबरच अन्य जोडधंदे करण्याची आवश्यकता आहे. उद्योगाच्या बाबतीत आपला समाज आजही मागे आहे. त्यामुळे ‘उद्योजक मंच’ स्थापन करून त्याद्वारे एकमेकांना योग्य सल्ला व मदत करण्याची आवश्यकता असल्याचेही पोहरे यांनी स्पष्ट केले. तसेच, (Samaj Bhushan Award) हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल त्यांनी बहुउद्देशिय तिरळे कुणबी संघाचे मनःपूर्वक आभार मानले.
- ■ तिरळे कुणबी समाजातील मान्यवरांचा सूर
■ वधु-वर परिचय मेळावा व सोयरीक पुस्तिकेचे प्रकाशन
■ समाजभूषण व नागरी सत्कार सोहळा थाटात काळानुसार समाजाने बदलले पाहिजे
ज्या काही वाईट परंपरा, प्रथा आहे, त्याचा त्याग करून काळानुरुप तिरळे कुणबी समाजाने बदलले पाहिजे, असा सूर तिरळे कुणबी समाजातील अभ्यासक, विचारवंत व राजकीय नेत्यांनी काढला. बहुउद्देशिय तिरळे कुणबी संघातर्फे (विदर्भप्रदेश) त्रिमूर्तीनगरातील अनुसया मंगल कार्यालयात रविवारी वधु-वर परिचय मेळावा, सोयरीक पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा, जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज जयंती उत्सव आणि समाजभूषण (Samaj Bhushan Award) पुरस्कार प्रदान समारंभ व नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वक्त्यांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दीनानाथ पडोळे होते. शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांच्या हस्ते या शानदार सोहळ्याचे उद्घाटन झाले. प्रमुख वक्ते म्हणून अभ्यासक प्रवीण देशमुख होते. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री परिणय फुके, गिरीश पांडव, सलील देशमुख, प्रवीण कुंटे पाटील, वृंदा नागपुरे, रेखा बाराहाते, वृंदा ठाकरे, अवंतिका लेकुरवाळे, उज्ज्वला बोढारे, उद्योजक प्रभाकरराव देशमुख, राकेश पन्नासे प्रामुख्याने उपस्थित होते. यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते शेतकरी नेते, लोकनायक आणि दैनिक देशोवतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांना समाजभूषण पुरस्कार (Samaj Bhushan Award) प्रदान करण्यात आला. तर, सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराव पन्नासे, प्राचार्य डॉ. विठ्ठल अरजपुरे आणि मराठीचे प्राध्यापक डॉ. कोमल ठाकरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे संस्थापक सुरेश गुडधे पाटील, अध्यक्ष जानराव पाटील केदार, उपाध्यक्ष रमेशचंद्र ठवळे पाटील, सचिव अशोक पांडव यांच्यासह नागपूर शहर व ग्रामीण कार्यकारीणीचे सर्व सदस्य, महिला मार्गदर्शक समितीच्या सदस्या प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी समाजातील मान्यवरांच्या हस्ते सोयरीक पुस्तिकेचे आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन पार पडले. सर्वप्रथम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ( Sant Tukaram Maharaj ) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. दीनानाथ पडोळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कुणबी समाज हा सर्व समाजाला बरोबर घेऊन चालतो असे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराव पन्नासे यांनी असे मेळावे घेणे आवश्यक आहे, याची माहिती दिली. डॉ. अभय दातारकर (Dr. Abhay Datarkar) यांनी सध्याची राजकीय, सामाजिक स्थिती बघता तिरळे कुणबी समाजाने संघटित व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी मंत्री परिणय फुके यांनी समाजाचे सामूहिक विवाह सोहळे आयोजित करावे, असे सांगितले. यावेळी जानराव पाटील केदार यांनी प्रास्ताविकातून संघाचे कार्य, उद्देश आणि आतापर्यंत राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. वामनराव येवले यांनी संचालन केले. तर रवि देशमुख यांनी आभार मानले. दुसऱ्या सत्रात वधु-वर परिचय मेळावा पार पडला.
आपण सर्व एकत्रित येवू : सुनील केदार
तिरळे कुणबी समाज एक असला तरी वैचारिकदृष्ट्या विभागला गेला आहे. अशा कार्यक्रमामुळे आपण सर्व एकत्रित येवू, अशी आशा माजी मंत्री सुनील केदार ( Former Minister Sunil Kedar )यांनी व्यक्त केली. सध्या धार्मिक कर्मकांडांना उधान आले आहे. आस्था असावी पण, त्याला कर्तृत्वाची जोड असली पाहिजे. जगासोबत स्पर्धा करण्यासाठी आपण निघालो आहोत. पण, सध्याचे धार्मिक वातावरण बघता आपण पुढच्या पिढीला भजन, पूजन करणेच शिकवणार काय, असा प्रश्न उपस्थित करून यावर विचार करण्याची वेळ आली असल्याचेही केदार याप्रसंगी म्हणाले.
कृतीतून बोलले पाहिजे
डॉ. कोमल ठाकरे ( Dr. Komal Thackeray ) नैतिक समाजाच्या निर्मितीसाठी राजकारणाची अत्यंत आवश्यकता आहे. पण, त्या दिशेने तिरळे कुणबी समाज कृती करतो काय, असा प्रश्न उपस्थित करून कृतीतून बोललं पाहिजे, तेव्हाच आपल्या वाणीला अर्थ प्राप्त होईल, असे डॉ. कोमल ठाकरे नागरी सत्काराला उत्तर देताना म्हणाले.
आत्महत्येत कुणबी शेतकऱ्यांचे प्रमाण ५३ टक्केः प्रवीण देशमुख
विदर्भात जे काही शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यामध्ये ५३ टक्के कुणबी समाजातील शेतकऱ्यांचा समावेश आहे, अशी खळबळजनक माहिती अभ्यासक प्रवीण देशमुख ( Praveen Deshmukh )यांनी याप्रसंगी दिली. संपूर्ण जगाचे पोट भरणाऱ्या कुणबी समाजावर आज ही वेळ का आली, याचा विचार करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. जुने कुचकट विचार सोडून सामाजाने बदललेपाहिजे. घरोघरी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे पारायण व्हायला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.