अकोला (Akola crime) : जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील पोळा चौक परिसरात नागपूरवरून अकोल्यात आलेल्या पाहुण्यांनी एका युवकाच्या घरासमोर चारचाकी वाहन उभे केल्याने त्याचा राग अनावर होऊन लोखंडी रॉडने आरोपी युवकाने सदर चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याची (Akola crime) घटना रविवार, २ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली आहे.
जुने शहरातील बाळापूर मार्गाकडे जाणार्या पोळा चौक परिसरात नागपूरवरून चारचाकी वाहनाने पाहुणे त्यांच्या नातेवाइकाकडे अकोला शहरात आले होते. रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी सदर आरोपी युवकाच्या घरासमोर त्यांचे चारचाकी वाहन उभे केले. यामुळे आरोपी युवकाचा राग अनावर झाल्याने लोखंडी रॉडने त्याने त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या वाहनाची तोडफोड केली. ही (Akola crime) संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. याप्रकरणी जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी युवकाविरूध्द गुन्हा नोंद केला आहे.