Published on
:
16 Nov 2024, 5:15 am
Updated on
:
16 Nov 2024, 5:15 am
मालेगाव : मध्य मतदारसंघात वापरल्या जाणार्या बॅलेट युनिटवर उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव, फोटो व चिन्हाचा समावेश असलेले बॅलेट लावण्याचे काम सुरू आहे. मध्य मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात 13 उमेदवार आहेत.
नोटासह 14 नावांचा बॅलेटवर समावेश आहे. सीलिंग व सेटिंगचे काम लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सदगीर यांनी दिली. उमेदवार संख्या 13 असल्याने प्रत्येक केंद्रावर एकच ईव्हीएम मशीन वापरले जाणार आहे. येथील शिवाजी महाराज जिमखाना येथे ईव्हीएम मशीनची जोडणी करून बॅलेट युनिटवर बॅलेट पेपर लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. याकामी 20 टेबल लावण्यात आले आहे. प्रत्येक टेबलवर चार याप्रमाणे 160 कर्मचारी कार्यरत आहेत. मालेगाव मध्यमध्ये एकूण 344 मतदान केंद्रे आहेत. मतदानासाठी 412 कंट्रोल युनिट, 412 बॅलेट युनिट, 447 व्हीव्हीपॅट लावले जाणार आहेत. प्रत्येकी 68 बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट 20 टक्के राखीव आहेत. 103 व्हीव्हीपॅट राखीव ठेवले आहेत. मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने नुकतेच 1500 हून अधिक कर्मचार्यांना मोहन चित्रपटगृह व एटीटी हायस्कूलमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. ईव्हीएम जोडणी, बॅलेट लावण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व मशीन पुन्हा सुरक्षितपणे स्ट्राँगरूम ठेवले जातील. मतदानाच्या एक दिवस अगोदर मंगळवारी (दि. 19) जिमखाना परिसरातून कर्मचार्यांना निवडणूक साहित्यांचे वाटप करणार असल्याचे सदगीर यांनी सांगितले
मालेगाव मध्य मतदार संख्या
पुरुष : एक लाख 76 हजार 33, महिला :
एक लाख 66 हजार 670, तृतीयपंथीय : 10,
एकूण मतदार : 3 लाख 42 हजार 713.
सीलिंग व सेटिंगसाठी नियुक्त अधिकारी तसेच कर्मचार्यांचे मोबाइल जिमखान्याच्या प्रवेशद्वारीच जमा करण्यात आले होते. मोबाइलवर नावाची चिठ्ठी लावून पेटीत ठेवण्यात आले होते. निवडणूक निरीक्षक बलदेव पुरुषार्थ यांनी जिमखान्यात संबंधित अधिकार्यांची बैठक घेत महत्त्वाच्या सूचना केल्या. याप्रसंगी सहायक पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू उपस्थित होते.