सेलू (Wardha):- सेलू तालुक्यातील चानकी कोपरा गावाचा गेल्या अनेक दिवसापासून येथील शेतकऱ्यांना ओलिता करिता मोठी अडचण निर्माण होत आहे गेल्या वर्षभरापासून येथील शेतकऱ्यांकरिता नवीन डीपी मंजूर असून जागे अभावी डीपी चे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या ओलिताच्या खोडा निर्माण होत आहे.
मुख्य अधीक्षक अभियंता यांना दिले निवेदन
जुन्या असलेल्या डीपी वरती विद्युत पंप जास्त प्रमाणात झाल्याकारणाने विद्युत रोहित्ररामध्ये प्रत्येक वेळेस बिघाड येऊन विद्युत पुरवठा (Power supply) खंडित होतो त्यामुळे शेतकऱ्यांचे ओलीत होत नसून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. खरांगणा गोडे कार्यालया अंतर्गत येणाऱ्या चाणकी गावाकरिता मुसलमान डीपी म्हणून सध्या रोहित्र आहे. गेल्या अनेक दिवसापासून त्या शिवारामध्ये दुसरे रोहित्र मंजूर झाले असून अजून पर्यंत त्याचे काम झाले नाही. त्यामुळे एकाच रोहितरावर जास्त भार येत असल्याने शेतकऱ्यांचे वलीत होण्यास अडचण निर्माण झाली आहे. महावितरण कार्यालयाकडून शेतकऱ्यांना उडवा उडवी चे उत्तर मिळत असून दुसरे रोहित्र चे काम लवकर व्हावे याकरिता येथील काँग्रेसचे सेलू तालुका उपाध्यक्ष अतुल पन्नासे यांच्या नेतृत्वात येथील शेतकऱ्यांनी मुख्य अभियंता कार्यालय वर्धा येथे निवेदन सादर केले व या निवेदनातून नवीन रोहित्र लवकर बसवून शेतकऱ्याची अडचण दूर करावी अशी यावेळी मागणी केली. निवेदन देतेवेळी सेलू तालुका उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी अतुल पन्नाशे रोशन गाठे अमित गाठे सुहास दंडारे गजानन काळे विशाल हेपट राहुल बहादुरे चिंधू चहांदे मनीष पाठक योगेश इटनकर या शेतकऱ्याची प्रामुख्याने उपस्थिती होती.