मानोरा (Washim):- केंद्र व राज्य शासनाने (State Govt) दिव्यांग बांधवांचा जलदगतीने विकास व्हावा, याकरीता विविध सोयी, सुविधा व सवलती उपलब्ध करून दिले आहे. याबातच्या शासन निर्णय सुध्दा जारी केले आहे. तरीपण दीव्यांग बांधवाना ग्राम पंचायत, नगर पंचायत मार्फत अपंग (handicapped) कल्याण पुनर्वसनचा ५ टक्के निधी अनेकांना मिळालेला नाही. यासह विविध प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे लक्ष केंद्रीत करून अपंग बांधवांच्या मागण्या सोडवाव्यात असे निवेदन मुख्यकार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांना दिव्यांग बांधवांनी दिले आहे.
मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिव्यांग बांधवांचे निवेदन
निवेदनात नमूद केले आहे की, जिल्हयातील अनेक गावासह मानोरा तालुक्यातील पोहरादेवी सह परिसरातील सोमेश्वरनगर, फुलउमरी, शेंदोना, आसोला खुर्द येथील अपंग बांधवांना ग्राम पंचायत मार्फत ५ टक्के अपंग कल्याण पुनर्वसन निधी मिळालेला नाही. जिल्हा परिषदेचा निधीही अप्राप्त आहे. अपंगांना घरकुल करीता जागा उपलब्ध करून देऊन प्राधान्याने घरकुल मंजूर करण्यात यावे. अपंगांना घराचा कर माफ करण्यात यावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर भारत जाधव, जयकुमार राठोड, दत्तराम जाधव, मायाबई खडसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.