अकोट शहरातील रस्ते ठरताहेत वाहनधारकांसाठी ब्लॅक स्पॉट:वर्षभरात 20 ठार; हिवरखेड मार्गावर गेला नऊ जणांची जीव‎

2 hours ago 1
अकोट शहरातील रस्ते अपघाताचे ब्लॅक स्पॉट बनले असून, वर्षभरात २० जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार एकट्या हिवरखेड मार्गावर वर्षा अखेर सर्वाधिक अपघात झाले असून ९ जण या मार्गावर मृत्युमुखी पडले आहेत. प्रशासनाकडून हा आकडा देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र ही संख्या अधिक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अकोट तालुक्यातील हिवरखेड मार्गावरील अडगाव फाटा ,वडाळी सटवाई फाटा, दर्यापूर मार्गावरील ढगा फाटा ,अंजनगाव मार्गवरील वाई फाटा ,पणज फाटा, अकोला मार्गावरील तांदूळवाडी फाटा ,वणी वरुळा फाटा ,देवरी फाटा ,पोपटखेड मार्गावरील मोहाळा फाटा, टी- पॉइंट, आदी ठिकाणे यासह अनेक ठिकाण ग्रामीण भागासह शहरात अपघाताची केंद्र स्थाने बनली असून, मुख्यतः वरील ठिकाणावर दररोज घडणारे अपघाता चिंता वाढवणारे ठरले आहेत. अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत एकूण २८ गंभीर स्वरूपाचे अपघात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या वर्षभराच्या काळात घडले. या अपघातात १७ जणांचा मृत्यू तर ११ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. शहर पोलिस स्टेशन हद्दीत १४ अपघाताची नोंद असून, यामध्ये ३ जणांचा मृत्यू तर ११ जणांना दुखापत झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. नादुरुस्त रस्ते,अनियंत्रित वेग, शॉर्टकट साठी चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, वाहनांमध्ये ओव्हरटेक करण्याची स्पर्धा, मद्यपान करून वाहन हाताळणे, विना हेल्मेट वाहन चालवणे, ही अपघाताच्या घटनेची मुख्य कारणे बनली आहे. शहरातील काही मार्ग नव्याने बांधण्यात आल्याने वाहन चालक वेग मर्यादा ओलांडताना दिसतात. अशात सर्वाधिक अपघात होण्याचा धोका असतो. यापुढे वाहनचालकांनी रस्त्यावरून आपले वाहन चालवताना आपल्याबरोबर समोरच्या प्रवाशांची व वाहनधारकांची काळजी घेणे गरजेचे ठरणार आहे. याचा विचार वाहनधारकांनी केला तरच अकोट तालुक्यातील अपघाताची मालिका थांबण्यास मदत होईल, अन्यथा अशाच पद्धतीने दरवर्षी अनेक निष्पाप बळी जाण्याची शक्यताही सर्वसामान्य लोकांमधून वर्तवण्यात येत आहे. दोन वर्षांच्या तुलनेत २०२४ य वर्षात अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहेत. पोपटखेड मार्गावर अवजड वाहतुकीमुळे ग्रामीण हद्दीत अपघात वाढत आहे. शहराबाहेरून वाहतुकीसाठी बायपास रस्ता असल्यास काही प्रमाणात अपघात कमी होतील अशातच या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न झाल्याने अवजड वाहने येऊन अपघात होतच राहतील. राज्य महामार्ग असल्याने शिवाय मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे साठे असल्याने या भागात अवजड वाहनांची संख्या येथे जास्त आहे. कंटेनरसारखी वाहने रस्त्यावर बंद पडल्यानंतर रस्त्यावरच उभी केली जातात. हॉटेल, धाब्यांवर थांबण्यासाठी कंटेनरचालक वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. रात्रीच्या वेळी हे कंटेनर न दिसल्यास त्यावर इतर वाहने आदळून किंवा अपघात होऊ नये म्हणून वाहन नियंत्रित करण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला उतरतात. वेग नियंत्रित ठेवा बहुतांश अपघात हे भरधाव वाहनावरचे नियंत्रण सुटल्यानेच घडल्याचे आढळून येते. त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रित असावा. प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे पालन न झाल्यास येत्या काळात कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.- किशोर जुनघरे, पोलिस निरीक्षक, अकोट ग्रामीण.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article