Published on
:
03 Feb 2025, 4:43 am
Updated on
:
03 Feb 2025, 4:43 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : संगीत क्षेत्रामधील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कार २०२५ सोहळा लॉस एंजेलिसच्या डाउनटाउनमधील Crypto.com अरेना येथे सुरु आहे. विशेष म्हणजे अमेरिकन गायिका आणि गीतकार बियॉन्से हिने इतिहास रचला. तिच्या 'काउबॉय कार्टर'ला सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बमचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. अर्ध्या शतकभराच्या काळात कंट्री म्युझिक श्रेणीत ग्रॅमी जिंकणारी ती पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली.
२०२४ च्या काउबॉय कार्टर या अल्बमसह बियॉन्सेला ११ नामांकने मिळाली. "खरंच मी याची अपेक्षा केली नव्हती," अशी प्रतिक्रिया बियॉन्से हिने व्यक्त केली. प्रेझेंटर टेलर स्विफ्ट हिने तिला ग्रॅमीची ट्रॉफीची प्रदान केली. "मी देवाचे आभार मानतो की इतक्या वर्षांनंतरही मला जे आवडते ते मी करू शकले." असेही ती पुढे म्हणाली.
६७ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळा एक खास क्षण राहिला. या सोहळ्यात लेडी गागा आणि ब्रुनो मार्स यांनी लॉस एंजेलिसल आगीतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यांना त्यांचा परफॉर्मन्स जंगलातील आगीमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी समर्पित केला.
चंद्रिका टंडन यांची 'ग्रॅमी'वर मोहोर
भारतीय-अमेरिकन गायिका आणि उद्योजिका चंद्रिका टंडन यांना 'त्रिवेणी' या त्यांच्या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट न्यू एज, अँबियंट अथवा चांट अल्बम श्रेणीत ग्रॅमी पुरस्कार मिळाला. टंडन ह्या पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नूयी यांची मोठी बहीण आहेत. २००९ च्या सोल कॉल नंतर टंडन यांना दुसऱ्यांदा ग्रॅमी नामांकन मिळाले होते. तर त्यांना जिंकलेला हा पहिला ग्रॅमी पुरस्कार आहे.