आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी इंग्लंड क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर आहे. इंग्लंडचा टीम इंडियाविरुद्धच्या टी 20i मालिकेत पराभव झाला. टीम इंडियाने रविवारी 2 फेब्रुवारीला इंग्लंडवर पाचव्या आणि अंतिम सामन्यात 150 धावांनी विजय मिळवत मालिका 4-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. आता त्यांनतर उभयसंघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. एकूण 3 सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.तर जोस बटलर याच्याकडे एकदिवसीय संघाचं कर्णधारपद आहे.
रोहितसेनेची बॉर्डर गावसकर ट्रॉफीनतंर ही मायदेशातील पहिली आणि एकदिवसीय मालिका असणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना टीम इंडियात उभी फूट पडली असल्याचं म्हटलं जात होतं. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्वकाही ठीक नसल्याचं म्हटलं जात होतं. आता सर्व चर्चेवर अखेर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पूर्णविराम लावला आहे. गंभीरने याबाबत काय सांगितलं? जाणून घेऊयात.
गौतम गंभीरने सर्वच सांगितलं
“हे खेळाडू एकमेकांसह खूप क्रिकेट खेळले आहेत. एक महिन्याआधी अशा अनेक प्रकारच्या अफवा होत्या”, असं गंभीर हसत हसत म्हणाला. जेव्हा टीम इंडियाचं कामगिरी निराशाजनक असते, तेव्हा ड्रेसिंग रुमबाबत असं काही तरी उलटसुलट म्हटलं जातं. मात्र जसं आमच्या बाजूने सर्व काही घडायला सुरुवात होते, तेव्हा सर्वकाही नियमित होतं”, असं गौतम गंभीरने म्हटलं. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी 20i सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. टीम इंडियाच्या विजयानंतर अभिनव मुकुंद, पार्थिव पटेल आणि केविन पीटरसन या त्रिकुटाने गंभीरसह संवाद साधला. गंभीरला या दरम्यान ड्रेसिंग रुमबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्याने वरील उत्तर दिलं.
वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा (बुमराहचा बॅकअप).