सीरियल किसरचा टॅग मिळालेला अभिनेता म्हणजे इमरान हाश्मी. असा टॅग त्याच्या आधी कुणालाही मिळालेला नाही. अभिनेत्याच्या प्रत्येक चित्रपटात किसिंग सीन हा असतोच. ‘मर्डर’ चित्रपटात मल्लिका शेरावतसोबत किसिंग सीन देऊन इम्रानने खळबळ उडवून दिली होती. इमरानचे चित्रपट फक्त त्याच्या किसींग सीनसाठीच नाही तर त्याच्या चित्रपटातील उत्कृष्ट गाण्यांसाठी आणि रोमँटिक दृश्यांसाठी देखील प्रसिद्ध आहेत.
या अभिनेत्याने आतापर्यंत पडद्यावर आपल्या अनेक सहकलाकारांना किस केले आहे. मात्र बऱ्याच जणांना हे माहित नसेल की यासाठी त्याला फार मोठी किंमत मोजावी लागते. प्रत्येक किसिंग सीननंतर इमरान हाश्मीला या सीनबद्दल लाखोंची किंमत मोजावी लागते असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. याचा खुलासा त्याने स्वत:हूनच केला आहे. पत्नीकडून मारहाणीचा सामना करावा लागतो आणि ती महागड्या भेटवस्तूही घेते.
किसिंग सीन पाहिल्यावर बायको मारायची
इमरान हाश्मीचे ‘द किस ऑफ लाईफ’ हे पुस्तक लॉन्च झाले तेव्हा अभिनेत्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता. चित्रपटात किसिंग सीन दिल्यावर पत्नीची प्रतिक्रिया काय असते, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. याला उत्तर देताना अभिनेत्याने सांगितले होते की, त्याच्या पत्नीला किसिंग सीन्सचा खूप राग येतो.
अभिनेत्याने सांगितले होते, “सुरुवातीला, जेव्हाही ती माझे असे कोणतेही सीन पाहायची तेव्हा ती मला तिच्या बॅगने खूप मारायची. मात्र, नंतर तिला गोष्टी समजू लागल्यावर तिने बॅगने नव्हे तर हाताने मारायला सुरुवात केली. प्रत्येक किसिंग सीननंतर त्याला पत्नीचा मार खावाच लागायचा असही त्याने म्हटलं आहे.
किसिंग सीनच्या बदल्यात इम्रानला लाखोंचा फटका बसतो
इम्रानने पुढे सांगितले की “प्रत्येक किसिंग सीन किंवा बोल्ड सीनच्या बदल्यात मला माझ्या पत्नीला महागडी बॅग किंवा गिफ्टस् द्यावे लागताात. तिचा वॉर्डरोब बॅगने भरलेला आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की माझा प्रत्येक चित्रपट ज्यामध्ये किसिंग सीन आहे तो हिट होतो, परंतु माझ्या पत्नीला त्याचा खूप राग येतो.”
इमरान हाश्मीचा वर्क फ्रंट
इम्रानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या वर्षी तो सलमान खानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. इम्रानने या व्यक्तिरेखेत उत्कृष्ट अभिनय केला होता. सध्या तो एक-दोन नव्हे तर पाच चित्रपटांमध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे. त्याच्याकडे ‘दे कॉल हिम ओजी’, ‘ग्राउंड झिरो’, ‘गोदाचारी 2’, ‘शूटआउट ॲट भायखळा’, ‘कॅप्टन नवाब’ असे चित्रपट आहेत.