'जामीन नाही झाला तर एके 47 घेऊन येतो', असे म्हणत मयत मुलीच्या कुटुंबाला शिवीगाळ करण्यात आली. हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
कल्याण पूर्व येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार हत्या प्रकरणातील मयत मुलीच्या घराबाहेर तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नाहीतर अज्ञात व्यक्तींनी यावेळी कुटुंबाला धमकावल्याचीही माहिती मिळत आहे. आरोपी विशाल गवळीच्या जामीनासाठी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी शिवीगाळ करत घराबाहेर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अज्ञात तीन तरुणांनी शिवीगाळ करत घराबाहेरील दुकानांवर लाथा मारल्याचाही प्रकार घडला. जामीन नाही झाला तर एके 47 घेऊन येतो असे म्हणत मयत मुलीच्या कुटुंबाला शिवीगाळ करण्यात आली. हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर वारंवार मागणी करूनही पोलीस घराबाहेर सुरक्षा देत नसल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी विशाल गवळी हा जेलमध्ये असून त्याच्या तिन्ही भावांना पोलिसांनी तडीपार केले आहे. कल्याण पूर्व येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून घरात नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचर करून तिचा खून केला होता. त्यानंतर पत्नी आणि एका मित्राच्या मदतीने त्या मुलीचा मृतदेह कब्रस्तानात फेकून देणारा नराधम आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी शेगावमधन अटक करण्यात आली होती.
Published on: Feb 03, 2025 03:35 PM