अकोला (Akola MIDC theft case) : एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील एमआयडीसी चारमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून एक दोन नव्हे तर सुमारे चार ते पाच दुकाने फोडून विविध प्रकाराचे साहित्य लंपास केले होते. या प्रकरणातील आरोपी नासीर खान जब्बार खान याला रयत हवेली जनता बँक परिसरातून रविवार, २ फेब्रुवारी रोजी अटक करून सुमारे एक ते सव्वा लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही (Akola MIDC theft case) कारवाई सिटी कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे.
एमआयडीसी चारमध्ये अज्ञात चोरट्यांनी सुमारे चार ते पाच दुकानांना लक्ष्य करून अंदाजे तीन लाख रूपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची माहिती कोतवाली पोलिसांनी कारवाई करतेवेळी दिली आहे. त्यातील आरोपी नासीर खान जब्बार खान (५०) रा. नेहरू नगर, खैर मोहम्मद प्लॉट अकोला याला अटक करून त्याच्याकडून सुमारे १ ते १ लाख २५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर आरोपीला सिटी कोतवाली पोलिसांनी मुद्देमालासह एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही (Akola MIDC theft case) कारवाई पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, शहर पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, पोलिस निरीक्षक सुनील वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार महेंद्र बहाद्दूरकर, ख्वाजा, अजय भटकर, अश्विन सिरसाट, शैलेश घुगे, किशोर येऊल आदींनी केली आहे.
एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल!
सदर चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर (Akola MIDC theft case) चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी नासीर खान जब्बार खान याला सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.