हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचं महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे. घर बांधण्यापासून कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात याबाबत सांगितलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घर असेल तर जीवना अडचणी येत नाहीत, असं सांगितलं जातं. रात्री झोपही नीट लागते. पण अनेकदा घर वास्तुशास्त्रानुसार असूनही चुकीच्या दिशेला पाय आणि डोकं करून झोपल्यास त्रास सहन करावा लागू शकतो. अनेकदा रात्री नीट झोप लागत नाही. विनाकारण काही ना काही विचार मन खात असतात. अशा स्थितीत रात्री निवांत झोप लागणं कठीण असतं. वास्तुशास्त्रानुसार, काही नियमांचं पालन केल्यास या अडचणी काही प्रमाणात कमी होऊ शकतात. रात्री झोपताना कायम पाय उत्तरेकडे आणि डोकं दक्षिणेकडे असावं. जर तुम्ही उलट झोपलात तर त्याचे वाईट अनुभव येतात. म्हणजेच दक्षिणेकडे पाय आणि उत्तरेकडे डोकं करून झोपू नये. वास्तुशास्त्रानुसार झोपताना पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये. असं झोपल्यास आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागू शकतो.
वास्तुशास्त्रानुसार दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोकं करून झोपणं कधीही चांगलं मानलं गेलं आहे. म्हणजेच पाय हे उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावेत. अशा पद्धतीने झोपल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम लाभतं. कोणत्याही गोष्टीचं झोपताना विनाकारण टेन्शन येत नाही. दक्षिण आणि पूर्व दिशेला डोकं करून झोपल्यास व्यक्तीचं आयुष्य वाढतं. शारीरिक आणि मानसिक तणावातून दिलासा मिळतो. दुसरीकडे, दक्षिण आणि पूर्व दिशेला पाय करून झोपल्यास अशुभ मानलं जातं. यामुळे डोक्याला योग्य पद्धतीने रक्तपुरवठा होत नाही असं मानलं जातं.
दक्षिण ही यमाची दिशा आहे. मृत व्यक्तीला दक्षिणेकडे पाय करून ठेवतात. स्मशानातही अशाच पद्धतीने ठेवलं जातं. त्यामुळे घरात अशा पद्धतीने झोपणं योग्य नसल्याचं वास्तूतज्ज्ञांचं म्हणणं आहे. या उलट दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्यास सुख समृद्धी प्राप्त होते. तर या दिशेला पाय करून झोपल्यास आरोग्यावर परिणाम करते. तसेच धन हानी, मृत्यू आणि आजाराचं भय राहतं.