Nana Patekar Love Life: झगमगत्या विश्वातील दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर कायम त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. पण एक काळ असा देखील होता जेव्हा नाना पाटेकर त्यांत्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होते. बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना नाना पाटेकर यांचा जीव स्वतःपेक्षा 20 वर्ष लहान अभिनेत्रीवर जडला होता. ज्या अभिनेत्रीच्या प्रेमात नाना पाटेकर होते, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मनिषा कोईराला आहे. एक काळ असा होता जेव्हा झगमगत्या विश्वात सर्वत्र फक्त अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री मनिषा कोईराला यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता.
दोघांनी 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्निसाक्षी’ सिनेमात एकत्र काम केलं. त्यानंतर ‘खामोशी’ सिनेमात दोघे एकत्र दिसले. मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांना विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
तेव्हा नाना पाटेकर मोठे स्टार होते. तर मनिषा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. बॉम्बे आणि 1942: ए लव स्टोरी सिनेमातून मनिषा हिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. सांगायचं झालं तर, दोघांच्या नात्याबद्दल कधी अधिकृत माहिती समोर आली नाही. पण इंडस्ट्रीमध्ये दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
फिल्मफेअर दरम्यान नाना पाटेकर यांनी मनीषाला ‘कस्तुरी मृग’ म्हणत तिचे कौतुक केलं आणि त्यांच्या ब्रेकअपबद्दल सांगितले. नाना पाटेकर म्हणाले होते, ‘मनिषा कोईराला स्टारर ग्रहण सिनेमा पाहिला आहे. , मनीषामध्ये जन्मजात प्रतिभा आहे. ती सर्वात संवेदनशील अभिनेत्री आहे. ती कस्तुरी मृगासारखी आहे, तिला हे समजलं पाहिजे की तिला कोणाशीही जुळवून घेण्याची गरज नाही. तिच्याकडे सर्व काही आहे आणि ते पुरेसे आहे. ती स्वतःशी काय करत आहे हे जेव्हा मी पाहते तेव्हा मी माझे अश्रू रोखू शकत नाही.
‘कदाचित आज मला तिच्याबद्दल काहीही बोलायचा अधिकार नाही. ती फार लवकर त्रस्त होते. ब्रेकअप आयुष्यातील फार कठीण काळ आहे. ‘मला आजही तिची आठवण येते, ज्या वेदना मला झाल्यात त्या मी व्यक्त करु शकत नाही.’ असं देखील नाना म्हणाले होते. पण आता दोघे त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत.