Published on
:
03 Feb 2025, 10:04 am
Updated on
:
03 Feb 2025, 10:04 am
जळगाव : चोपडा तालुक्यातील नागलवाडी रोडवरील वराड फाट्याजवळून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना चोपडा शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 1 लाख 45 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीसात रविवार (दि.2) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, चोपडा शहरातील नागलवाडी रोडवरील वराड फाट्याजवळून परभणी जिल्ह्यातील दोन जण प्रतिबंधित असलेल्या गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (दि.2) रात्री चोपडा शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत संशयित आरोपी रोहित संजय शेळके (वय-25 आणि तुळशीराम कचरू आव्हाने (वय-20 दोघे राहणार परळीरोड, भीम नगर परभणी) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 45 हजार रुपये किमतीचा 14 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. याप्रकरणी दोघांविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे हे पुढील तपास करीत आहेत.