वाढत्या वयानुसार तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचा सैल होणे आणि चेहऱ्यवर बारिक रेषा दिसून येणे यांच्या सारख्या समस्या उद्भवतात. परंतु तुम्ही जर त्वचेची योग्य काळजी घेतली तर वृद्धत्वाची लक्षणे कमी दिसून येतात. आजकाल मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या अँटी-एजिंग क्रीम आणि सीरम उपलब्ध आहेत परंतु या क्रिम्सच्या वापरामुळे तुमच्या त्वचेला हानी होऊ शकते. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यामधील रसायन. अशा परिस्थितीत, नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय सर्वोत्तम मानले जातात. तुम्हाला तुमची त्वचा दीर्घकाळ तरुण आणि चमकदार ठेवायची असेल तर तुम्ही मखाण्यांपासून बनवलेले फेस पॅक वापरू शकता.
मखाणा फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. मखाणे खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. मखाणे खाल्ल्यामुळे तुमचं वजन नियंत्रित होण्यास मदत होते. मखाण्यांमधील अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने आणि जीवनसत्त्वे त्वचेला पोषण देण्यास मदत करतात आणि तुमची त्वचा तरूण आणि निरोगी राहाते. चला तर जाणून घेऊया मखाण्यांपासून फेस पॅक कसे बनवायचे? काय उपाय केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
1) मखाणा आणि दुधाचा फेस पॅक : बदलत्या ऋतूमध्ये तुमची जर त्वचा कोरडी आणि निस्तेज झाली असेल तर मखाणा आणि दुधाचा फेस पॅक त्वचेला मॉइश्चराइज आणि हायड्रेट करते. त्यासोबतच हा फेस पॅक त्वचेला खोलवर हायड्रेट करतो आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येुते.
कृती :- मखाणा आणि दुधाचा फेस पॅक बनवण्यासाठी 5-6 मखना बारीक वाटून घ्या. त्यात 2 चमचे कच्चे दूध घालावे. जर त्वचा खूप कोरडी असेल तर तुम्ही अर्धा चमचे मध देखील घालू शकता. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 15 मिनिटांनंतर हलक्या हाताने मसाज करून थंड पाण्याने धुवा.
2) मखाणा आणि हळद फेस पॅक: हळदीमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे मखणासोबत तुमची त्वचेची चमकदार होते आणि सुरकुत्या कमी करतात. हा फेस पॅक त्वचेला घट्ट करतो आणि सुरकुत्या कमी करून वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत होते.
कृती :- मखाणा आणि हळद फेस पॅक बनवण्यासाठी 1 टेबलस्पून मखाणा पावडर घ्या. त्याध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा दही मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे कोरडे होऊ द्या. यानंतर कोमट पाण्याने धुवा.
3) मखाणा आणि कोरफड जेल: त्वचेवरील निस्तेजपणा आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही मखाणा आणि कोरफड जेलचा फेस पॅकचा वापर करू शकता. हा फेस पॅक वापरल्यामुळे त्वचेला खोलवर स्वच्छ होते आणि चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
कृती :- 1 चमचे मखाणा पावडरमध्ये 1 चमचे ताजे कोरफड जेल मिसळा. त्यामध्ये 4-5 थेंब गुलाबजल टाका. चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. यानंतर हलक्या हाताने मसाज करून पाण्याने धुवा.
4) मखाणा आणि मध फेस पॅक: मध त्वचेला केवळ मॉइश्चराइझ करत नाही तर घट्ट देखील करते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि तरुण राहते. हा फेस पॅक चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकून ताजे लुक देते. त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा घट्ट होते.
कृती :- 1 चमचा मखाणा पावडर घ्या. त्यात 1 चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. ते चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा.