अकोट (Akot Accident) : अकोट शहरातील अकोला नाक्यावरील दर्यापूर मार्गावर एका पाच वर्षीय मुलीला ट्रकने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना २ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नागरिक आक्रमक झाले होते. आरोपीला तत्काळ पकडण्याकरिता नागरिकांनी रात्रीच ठिय्या आंदोलन केले. या (Akot Accident) घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
अकोट शहरातील सिंधी कॅम्प येथे राहत असलेले दीपक कुमार हे आपल्या दोन मुलीसोबत दर्यापूर मार्गावर राहत असलेल्या त्यांच्या काकाकडे जेवण करण्याकरिता गेले होते. जेवण करून परत येत असताना दर्यापूर मार्गावर असलेल्या पुलावरून सिंधी कॅम्प येथे आपली दुचाकी क्रमांक एमएच ७८४ या गाडीने घरी जात होते. यावेळी कुट्टी (जनावरांचा चारा) भरून दर्यापूरकडून अकोटकडे येत असलेल्या एमएच २७ झेड ७४०९ या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या (Akot Accident) धडकीमध्ये स्वत: दीपक कुमार व एक मुलगी खाली पडले.
मात्र ते किरकोळ जखमी झाले तर पाच वर्षीय निधी ही समोरच्या चाकामध्ये आल्यानंतर ड्रायव्हरने ट्रक समोरून निधीच्या डोक्यावरून नेला तसेच मागचे चाकही निधीच्या डोक्यावरून गेल्याने तिचा डोके छिन्नविछिन्न होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. हे दृश्य पाहून जमाव चांगला आक्रमक झाला होता. त्यांनी आरोपी व गाडी मालक यांना पकडण्याकरिता ठिय्या आंदोलन केले. (Akot Accident) त्यामुळे एक ते दीड तास मृतदेह घटनास्थळीच पडून होता.
अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी अनमोल मित्तल, अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे हे घटनास्थळी येऊन त्यांनी आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिले व काही मिनिटातच आरोपीला अटक केली. तेव्हा जनतेने व त्यांच्या घरच्या लोकांनी मृतदेह उचलण्यास होकार दिला. सदर मृतदेह शवविच्छेदनाकरिता अकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आला. या (Akot Accident) प्रकरणी वृत्तलिहिस्तोवर आरोपीला पकडण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.