'जिहादी जे काय वळवळ करातयत त्या लोकांना एकदाच कळलं पाहिजे की हिंदुत्वावादी बाप आता सरकारमध्ये बसले आहेत. कोणत्याही हिंदू बहिणीला वाकड्या नजरेने पाहिले तुम्ही...', नितेश राणे काय म्हणाले?
आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणत आहोत, असं वक्तव्य भाजपचे नेते नितेश राणे यांनी केलंय. तर महाविकास आघाडीच्या काळात तुमचे अब्बा होते आता मात्र मस्ती नको, असं म्हणत नितेश राणेंनी हल्लाबोल केला आहे. सरकारी जमिनीवर पीरबाबा नको, भोंगे नकोच हा पाकिस्तान नव्हे अस देखील नितेश राणे यांनी म्हटलं आहे. ‘जिहादी जे काय वळवळ करातयत त्या लोकांना एकदाच कळलं पाहिजे की हिंदुत्वावादी बाप आता सरकारमध्ये बसले आहेत. कोणत्याही हिंदू बहिणीला वाकड्या नजरेने पाहिले तुम्ही…तर पोलीस जी कारवाई करायची ती करतील पण चुकून तुम्हाला जामीन भेटलं तर मीच दरवाजावर उभा राहिल.’, असं म्हणत नितेश राणेंनी इशारा दिलाय. पुढे ते असेही म्हणाले, थोडं थांबा अजून राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात देशातील सर्वात कडक धर्मांतरविरोधी कायदा आणत आणून दाखवू आणि सर्व हिंदू बहिणींना सुरक्षित करू दाखवू… नाही वळवळ करायला देणार या हिरव्या सापांना… खूप मज्जा मारली तुम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये…तेव्हा सरकारमध्ये सगळे अब्बा होते. पाकिस्तान झिंदाबादचे नाटकं होती तेव्हा मविआ काळात पण आता नाही…आता मस्ती नाही, असं म्हणत नितेश राणेंनी एकच इशारा दिलाय.
Published on: Feb 03, 2025 12:58 PM