व्हॅलेंटाईन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा एक खास प्रसंग असतो जो प्रत्येक प्रेमी युगुलांना आपापल्या परीने संस्मरणीय बनवायचा असतो. काही कपल्स या दिवशी आपल्या पार्टनरसाठी खास भेटवस्तू खरेदी करतात, तर काही रोमँटिक डिनर प्लॅन करून हा दिवस आनंदात साजरा करतात. तसेच प्रत्येकजण हा दिवस खास करण्यासाठी त्यांच्या पार्टनरला अनेक सरप्राईझ देत खास बनवतात. पण जर तुम्हाला तुमचं प्रेम आणखी खास आणि मौल्यवान बनवायचं असेल तर या व्हॅलेंटाईन डेला पार्टनरसोबत रोमँटिक ट्रिप प्लॅन करा. एकत्र वेळ घालवणे आणि सुंदर ठिकाणांचा अनुभव घेणे हे नाते अधिक दृढ करते.
रोमँटिक आणि मनाला आनंद देणारं भारताबाहेर अनेक नयनरम्य डेस्टिनेशन्स आहेत जे कपल्ससाठी परफेक्ट आहेत. शांत समुद्रकिनारे, हिरवीगार निसर्ग आणि सुंदर डोंगर असलेली ही ठिकाणे तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आयुष्यभर स्मरणात राहतील. या व्हॅलेंटाईन डेला सौंदर्य, रोमान्स आणि शांततेचा अद्भुत मिलाफ असलेल्या या पाच खास आंतरराष्ट्रीय ठिकाणांवर तुमचं प्रेम व्यक्त करा.
1. कराबी, थायलंड
थायलंडमधील कराबी या शांत समुद्रकिनाऱ्यांची ओळख येथील असलेले पांढरे वालुकामय समुद्रकिनारे, निळं पाणी हे रोमँटिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही प्रसिद्ध फाई फाई बेटांवर सफर करू शकता, बोट राइडचा आनंद घेऊ शकता आणि समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. थायलंडमधलं हे सुंदर ठिकाण तुमचा व्हॅलेंटाइन डे आणखी खास बनवेल. 2. भूटान
तुम्हाला हा व्हॅलेंटाइन डे एका शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात तुमच्या जोडीदारासोबत साजरा करायचा असेल तर भूतान एक अद्भुत पर्याय आहे. हा देश हिरव्यागार पर्वतांसाठी आणि सांस्कृतिक वारशासाठी खूप प्रसिद्ध आहे. टायगर्स नेस्ट मॉनेस्ट्री येथे ट्रेकिंग करताना आणि थिंपूचा प्रवास करताना तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संस्मरणीय क्षण घालवू शकता.
3. रस अल-खैमाह
दुबईपासून थोड्या अंतरावर असलेल्या रास अल खैमाह हे लक्झरी आणि रोमान्सचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या कपल्ससाठी योग्य ठिकाण आहे. वाळूचे ढिगारे, भव्य रिसॉर्ट्स आणि सूर्यास्ताचे सुंदर दृश्य हे तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल आणि व्हॅलेंटाइन डे निमित्त तुम्हाला हा क्षण स्मरणात राहील. साहसप्रेमी जोडप्यांसाठी येथे पॅराग्लायडिंग आणि डेझर्ट सफारीसारखे पर्याय उपलब्ध आहेत.
4. मालदीव
मालदीव हे जगातील सर्वात रोमँटिक डेस्टिनेशनपैकी एक मानले जाते. वॉटर व्हिला, क्रिस्टल-क्लियर पाणी आणि प्रायव्हेट समुद्र किनारे तुमचा व्हॅलेंटाइन डे एकदम छान साजरा होईल. इथे गेल्यावर पार्टनरसोबत स्कूबा डायव्हिंगचा आनंद घ्या आणि समुद्राच्या मधोमध डिनरप्लॅन नक्की करा.
5. श्रीलंका
श्रीलंके मधील समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे आणि चहाच्या बागा तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला मंत्रमुग्ध करतील. तसेच तेथील प्रसिद्ध गॉल किल्ल्यावर जाऊन इतिहासाचा अनुभव घ्या किंवा एला मधील रेल्वे प्रवासाचा आनंद घ्या. शांत वातावरणामुळे श्रीलंका हे प्रेमी युगुलांचे आवडते ठिकाण आहे.
या व्हॅलेंटाईनमध्ये तुम्हालाही तुमच्या गर्लफ्रेंड किंवा पत्नीला स्पेशल सरप्राईझ द्याचे असेल तर तुम्ही या परदेशी ठिकाणांना भेट देऊ शकता. ही ठिकाणे तुम्हाला एक अप्रतिम अनुभव देतील.