Published on
:
03 Feb 2025, 9:44 am
Updated on
:
03 Feb 2025, 9:44 am
ठाणे : ठाणे पालिका परिक्षेत्रात आणि ठाणे आयुक्तालयाच्या क्षेत्रात विविध गुन्ह्यांच्या घटना एका आठवड्यात घडलेल्या आहेत. यामध्ये सर्वाधीक आगीच्या घटनांची नोंद ही ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली आहे. दरम्यान, जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात जवळपास गंभीर घटनांची नोंद करण्यात आलेली आहे. त्यात मृतदेह आढळणे, बोट पेट्ने,इमारतीच्या गॅलेरीचा सज्जा पडणे ऑइल पडणे अशा घटना घडलेल्या आहेत. दरम्यान, यामध्ये आगीच्या घटना अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ठाणे हे दिवसेंदिवस हादसो का शहर झाल्याचे चित्र आहे.
ठाणे महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक आगीच्या आणि रस्त्यावर ऑइल गळतीच्या घटना घडल्या आहेत. तर त्याव्यतिरिक्त महामार्गावर भरधाव वेगाने धावणार्या अवजड वाहनांचे नियंत्रण सुटल्याने घडणारे अपघात, यामुळे ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांची पूर्ती दमछाक होताना दिसत आहे. मागच्यावर्षी सन 2024 मध्ये वर्षभरात आगीच्या घटनांची मोठी संख्या आहे. वर्षभरात आग लागण्याच्या 68 घटना घडल्या. या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाल्याचे चित्र आहे. विद्युत मीटरबॉक्स मधील मीटर जळणे, घरातील साहित्य जळणे, या सोबतच गाडयांना आग लागणे अशा विविध घटना आहेत. तर त्यातच अज्ञात वाहनातून रस्त्यावर ऑइल सांडणे, दुचाकी घसरणे, वाहनावरचे नियंत्रण सुटणे अशा एकूण 25 छोट्या-मोठ्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही प्रकारामध्ये सुदैवाने कुठलीही गंभीर घटना घडलेली नाही किंवा कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेली आहे.
जानेवारी अखेरीस अनेक घटनांची नांदी
ठाण्यात आगीच्या सत्रा पाठोपाठ रस्तयावर ऑइल सांडण्याच्या घटनान वेग घेतलेला दिसत आहे, जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंतच्या एका आठवड्याच्या कालावधी आगीच्या, तलावात मृतदेह आढळणे, इमारतीचा धोकादायक भाग कोसळणे, वृद्धा तोल जाऊ खाडीत पडणे, कंटेनरला अपघात, तर खाडीच्या किनार्यावर नादुरुस्त फायबर बोटीला आग लागण्याच्या ठळक घटना एका आठवड्यात घडल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.