अकोला-पातूर मार्गावर अपघातात 2 ठार, दोन जण गंभीर जखमी:अपघातांवर उपाययोजनांसाठी ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन
6 hours ago
1
बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास अकोला-पातूर राष्ट्रीय महामार्गावर शांता देवी संस्थानजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले. या ठिकाणी वारंवार अपघात असल्याने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. दुचाकी क्रमांक एमएच ३० बीएच ०८०४ आणि एमएच ३० बीयू ६४२४ यांची धडक झाली. अपघातस्थळी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने मदत पोहोचण्यात एक ते दीड तासाचा विलंब झाला. अपघातात ठार झालेल्यांमध्ये चिखलगाव येथील विठ्ठल चांदूरकर आणि गोटखेड येथील पंडित इंगळे यांचा समावेश आहेत. गंभीर जखमींना अकोल्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे उर्वरित पान ४ अपघातानंतर कापशी येथील ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या ठिकाणी वेळोवेळी अपघात होऊनही प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यांनी महामार्गावरील सर्व्हिस लेन व वैद्यकीय मदतीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या वेळी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जखमींना रुग्णालयात हलवले. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे कापशी ग्रामस्थांचा संताप
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)