अकोला पॅटर्नद्वारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन:जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पुढाकार

2 hours ago 1
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नोकरीची तयारी करणाऱ्यांना मदतीचा ठरणारा ‘अकोला पॅटर्न’ आता अमरावतीतही आला आहे. जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता महापात्र यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या पॅटर्नच्या माध्यमातून आतापर्यंत दोन कार्यशाळाही झाल्या आहेत. स्पर्धा परीक्षेतून नोकरीचा मार्ग शोधण्याकडे सध्या अनेकांचा कल आहे. त्यासाठी अकोला येथे तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दर महिन्याच्या पाच तारखेला सायंकाळी पाच वाजता मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग चालवले होते. पुढे प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी तो शिरस्ता कायम राखला. त्यामुळे महागडे शुल्क मोजून खासगी शिकवणी वर्गाला न जाऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी सोय उपलब्ध झाली होती. आता तोच पॅटर्न जिल्हा परिषदेच्या संजीता महापात्र यांनी राबविण्याचे ठरविले आहे. पहिल्या सत्रादरम्यान जिल्हा प्रशासनातील निवडक विभागप्रमुख यांनी या वर्गाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. दरम्यान दुसऱ्या सत्रात सहायक जिल्हाधिकारी तथा परीविक्षाधीन आयएएस अधिकारी अमर राऊत यांनी संबोधन केले. राऊत हे महाराष्ट्रीयन आहे. विशेष असे की पहिल्या प्रयत्नात ते आयपीएस झाले. परंतु आयएएस झाल्याशिवाय थांबायचे नाही, असा त्यांचा संकल्प उर्वरित. पान ४ दरमहा करणार मार्गदर्शन सीइओ संजीता महापात्र यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला हा उपक्रम अत्यंत उपयोगी आहे. युपीएससी, एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात तो आयोजित केला जातो. नोकरी शोधणाऱ्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसह सर्वासाठी तो मोफत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article