अकोल्यात मतदारसंघात शेतमाल व दुधाचे दर, लाडकी बहीण ठरला मुद्दा:अकोले विधानसभेसाठी 70 टक्क्यांवर झाले मतदान, टक्का वाढला
9 hours ago
1
अकोले अनुसूचित जमाती राखीव विधानसभा मतदारसंघातून बुधवारी घेण्यात आलेल्या मतदानावर सत्ताधारी महायुतीच्या उमेदवाराला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे प्रतिसाद मिळेल, असा जो अंदाज व्यक्त होत होता. तो प्रत्यक्षात याउलट चित्र दिसले. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांसह तरुण व वृद्ध मतदारांनी सोयाबीन व इतर शेतमालाला भाव मिळत नसल्याबद्दल सत्ताधाऱ्यांवर राग काढलेला दिसला. यांसह दूध उत्पादक शेतकऱ्यांनीही सत्ताधाऱ्यांकडे मतदानात पाठ फिरवल्याचे चित्र अकोले मतदारसंघातून जाणवले. मतदारांवर मनोज पाटील जरांगे यांचा कोणताच प्रभाव दिसून आला नाही. सकाळी आकरा वाजेपर्यंत २२ टक्क्यांवर मतदान झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत ५३.१९ टक्क्यांवर, सायंकाळी ५ वाजता ६६.१६ टक्के झाले. मतदानाची वेळ संपल्यावर सहा वाजल्यानंतरही मतदार संघातून अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लावून मतदारांनी मतदान केले. अपवादात्मक ठिकाणी कार्यकर्त्यांत झालेली बाचाबाची वगळता संपूर्ण मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. अकोल्यातून सुमारे ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. कोणाच्या पारड्यात विजयाची माळ पडेल ते शनिवारीच स्पष्ट होईल. अकोले मतदारसंघात ९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण २ लाख ६६ हजार १२९ मतदार मतदानास पात्र असून त्यात १ लाख ३८ हजार ८४५ पुरूष व १ लाख २७ हजार २८३ स्त्री मतदारांचा समावेश आहे, तर तृतीयपंथीय १ मतदार आहे. याशिवाय सेना दलातील ५३० मतदार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या नियोजनातून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या प्रक्रियेत ५९१ सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मतदान केंद्रांवरील सुरक्षाकामी सुमारे ३०४ पोलिस कर्मचारी व २८७ गृह रक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. याशिवाय प्रत्येक बुथवर २ सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती होती. ११ पथकांच्या सुरक्षा कर्मचारीवर्गाच्या माध्यमांतून पेट्रोलिंग करण्यात आली. अकोले मतदारसंघातून ३०७ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. यापैकी डोंगरवार (देवगाव), कोतूळ येथे १ मतदान केंद्र, पैठण मतदान केंद्र व संगमनेर तालुक्यातील पठार भागांतील नांदूर खंदरमाळ येथील व्होटींग मशिन स्लो झाल्याने सुमारे मतदारांना मतदानासाठी बराच वेळ ताटकळत बसावे लागले. लहीत बुद्रूक, कोतूळ, कळस बुद्रूक, वाघापूर येथील मतदान केंद्रावर मोठ्या संख्येत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. काही मतदान केंद्रांवर महीला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक जाणवली. वास्तविक ९ उमेदवारांपैकी आहेत. पण मविआचे बंडखोर अपक्ष उमेदवार मारुती मेंगाळ व मधुकर तळपाडे यांचा प्रभाव मतदारसंघातून तुरळक ठिकाणांहून दिसला. बहुतांश मतदान केंद्रावर फक्त तिरंगी लढत होत असल्याचे निदर्शनास आले. यात मविआकडून अमित भांगरे, महायुतीचे उमेदवार आमदार डॉ. किरण लहामटे व भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार वैभवराव पिचड तिरंगी शर्यतीत होते. निकालानंतर चित्र स्पष्ट होईल. अकोल्यात भांगरे, लहामटे व पिचड यांच्यातच चुरस अकोल्यात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अमित भांगरे यांनी शेतमालाचे भाव यावर मते मागीतली. महायुतीचे आमदार डॉ. लहामटे यांनी सुमारे अडीच हजार कोटींहून अधिक निधीतून मतदार संघात केलेल्या विकास कामांवर मते मागितली. वैभव पिचड यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे येथे तिरंगी लढत पहायला मिळाली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)