अक्षयवर बदलापुरात अंत्यसंस्कार होऊ देणार नाहीत:नागरिकांच्या भावना, डाव्या कानाच्या बाजूने मेंदूला गोळी लागली, पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

2 hours ago 1
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटरनंतर त्याच्यावर कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मांजर्लीत स्मशानभमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र, त्याला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. दरम्यान बदलापुरातील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करायला स्थानिकांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत अक्षय शिंदे याचे अंत्यसंस्कार मांजर्ली स्मशानभुमीत होऊ देणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे, तर पोलिसांनी मात्र अंत्यसंस्काराला कोणीही विरोध करू शकत नाही असं म्हटलं आहे. रक्तस्त्रावमुळे मृत्यु झाल्याचे समोर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून अक्षय शिंदे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पाच डॉक्टरांच्या पथकाने अक्षयचे पावणेचार तास शवविच्छेदन केले. यात अक्षयच्या डोक्याच्या डाव्या बाजूला एकच गोळीची खूण आढळून आली असून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले आहे. पोलिस एस्कॉर्टिंग पथकाच्या खात्याच्या आधारे, मुंब्रा पोलिसांनी दोन गुन्हे नोंद केले आहेत. त्यात एक अपघाती मृत्यू आणि दुसरा खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्ह्याचा समावेश आहे अक्षय शिंदेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून हत्या बदलापूर लैंगिक शोषणातील आरोपी अक्षय शिंदेचे विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून एन्काउंटर करण्यात आल्याचा आरोप पीडित कुटुंबाने बुधवारी उच्च न्यायालयात केला. पीडित कुटुंबाच्या या आरोपामुळे अक्षयच्या एन्काउंटरविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. बुधवारी झालेल्या सुनावणीत अण्णा मारुती शिंदे यांच्या वकिलांनी अक्षय शिंदेची हत्या निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केल्याचा आरोप करत थेट राज्य सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली एसआयटी चौकशी करण्याचीही मागणी केली. अण्णा शिंदेचे वकील अमित कटारनवरे म्हणाले, मुलाने रिमांड कॉपीत कोणताही त्रास नसल्याचे म्हटले होते. जामिन मिळून शकतो का? यावर त्याने जामीन मिळू शकतो असेही सांगितले. त्याने 500 रुपये मनी ऑर्डर करण्यास सांगितले होते. माझ्या मुलामध्ये पिस्तूल हिसकावून घेण्याची हिंमत नव्हती. या प्रकरणातील मोठ्या माशांना वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा निर्घृण खून करण्यात आला. महाराष्ट्रात लवकरच निवडणूक होणार असल्यामुळे कदाचित त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी त्याची हत्या करण्यात आली असावी. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article